सावित्रीबाई फुले पुण्यतिथी….

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षक होत्या. त्यांनी त्यांचे आयुष्य शिक्षण प्रसार व समाज सुधारणेच्या कामात व्यतीत केले. सावित्रीबाईंचा जन्म ०३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्हा, खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई ते वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. १८४० साली सावित्रीबाईंचा विवाह जोतीराव फुले यांच्यासह झाला. तेव्हा त्यांचे वय ०९ वर्ष होते तर जोतीरावांचे वय १३ वर्षाचे होते. जोतिबांनी सावित्रीबाईंना शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. स्त्रियांना दुय्यम दर्जा देणाऱ्या समाजव्यवस्थेला न जुमानता सावित्रीबाईंनी स्त्रीमुक्ती व स्त्रीशिक्षणाचा पाया रचला. १ जानेवारी १८४८ ला त्यांनी त्यांचे पती जोतीराव फुले यांच्यासह पहिली मुलींची शाळा सुरू केली. स्त्रियांनी शिकणे व शिकवणे हे धर्माला अनुसरून नाही असे काही लोकांना वाटे. अशा लोकांनी सावित्रीबाईंना कठोर विरोध केला. सावित्रीबाई फुले शाळेत जायला निघाल्या की हे विरोधक त्यांच्यावर चिखल, शेण, दगड फेक करीत असे. पण सावित्रीबाईंनी या सगळ्याला खंबीरपणे तोंड दिले. बाल विवाह, सती जाणे केस वपण अशा प्रत्येक क्रूर प्रथांना विरोध केला. महात्मा जोतिबा फुलेंनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या कार्यातही त्यांनी हातभार लावला. त्यांनी अनेक ठिकाणी समाजसुधारणेसाठी भाषणे दिली. सावित्रीबाईंनी ‘काव्यफुलें’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्य संग्रह ग्रंथ लिहिले. १८९६-९७ सालांदरम्यान पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. सावित्रीबाई प्लेगच्या रोग्यांची सेवा करीत होत्या. तेव्हा त्यांनाही प्लेगची लागण झाली. १० मार्च १८९७ साली प्लेगमुळे त्यांचे निधन झाले.
….अशा या सावित्रीबाई फुले यांना कोटी कोटी प्रणाम….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *