काँग्रेसच्या अनुसूचित जाती महीला जिल्हा अध्यक्षपदी सविता विधाते….

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:- रामाजीक कार्यात नेहमी अग्रभागी राहुन कोपरगाव तालुक्यात काँग्रेस पक्षाचे कार्य कमी काळात जनमाणसापर्यंत पोहचवून आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या सविता महेंद्र विधाते यांच्या कामाची काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनी दखल घेवून महाराष्ट्र प्रदेश महीला काँग्रेस अनुसूचित जाती महीला विभाग कमिटीच्या अहमदनगर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष व राज्याचे मंत्री नितीन राऊत यांच्या नेतृत्वाखाली व अखिल भारतीय अनुसूचित जातीचे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी मनोज बागडी ,विभागाचे अध्यक्ष विजय अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी सविता विधाते यांची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान कोपरगाव तालुक्यात सविता विधाते यांनी महीलांसाठी अनेक सामाजीक उपक्रम राबवून पक्षाची बांधीलकी जपली आहे.महीला मेळावे,व्यवसायीक साहीत्याचे वाटप,आर्थीक मदत देवून महीला सक्षमीकरण केल्याने त्यांचे कार्य अधिक प्रभावी झाल्याने अखेर त्यांच्या कार्याची दखल काँग्रेसच्या नेत्यांनी घेवून त्यांच्यावर अहमदनगर जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. सविता विधाते यांच्या निवडी बद्दल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,आमदार सुधीर तांबे,आमदार लहु कानाडे, आमदार आशुतोष काळे,नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे,पक्षाचे प्रदेश समन्वयक शिवाजी जगताप, बंटी यादव,जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे,पक्ष निरीक्षक सुभाष तोरणे,जिल्हा कार्याध्यक्ष यादवराव त्रिभुवन यांनी विषेश अभिनंदन करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. सविता विधाते यांच्या निवडीबद्दल कोपरगाव तालुकाध्यक्ष नितीन शिंदे,युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तुषार पोटे,शहराध्यक्ष रविंद्र साबळे,चंद्रकांत बागुल यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *