लोकल बाजारपेठेतील वस्तू खरेदी करत बाजारपेठ मजबूत करा:- शिवसेना ठाकरे गटाचे अवाहन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनीधी:- येणाऱ्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त लोकल बाजारपेठेतील वस्तू खरेदी करत आपल्या गावची बाजारपेठ मजबूत करावी असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उत्तर नगर संपर्क प्रमुख माजी मंत्री बबनराव घोलप, जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे, शहरप्रमुख कलविंदर डडियाल यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाद्वारे केले आहे.
या पत्रकाद्वारे स्थानिक नागरिकांना आवाहन केले आहे की, आज तुम्ही ज्याला ग्लोबल ब्रॅण्ड म्हणत आहात ते कधीकाळी असेच लोकल ब्रॅण्ड होते. मात्र, तिथल्या स्थानिक लोकांनी त्या वस्तूंचा वापर सुरु केला. त्यांनी त्या वस्तूंचा प्रचार आणि ब्रँण्डींग केला. याशिवाय त्या वस्तूंप्रती अभिमान बाळगला. त्यामुळे त्या वस्तू आणि लोकलहून ग्लोबल बनल्या. त्यामुळे दररोज प्रत्येक नागरिकाने आपल्या कोपरगांव साठी किंबहुना ज्या त्या स्थानिक गावच्या बाजारपेठेसाठी व्होकल बनायचं आहे. त्यामुळे लोकल वस्तू खरेदी करुन त्याचा प्रचार करा. मला पूर्ण विश्वास आहे आपलं गाव आपले नागरिक तसेच आपला देश असं करु शकतो”.
कोरोना संकंटादरम्यान आपल्याला कोणत्याही ऑनलाइन संस्थेने वेबसाइटने कंपनीने मदत केली नाही. या संकंट काळात लोकल उत्पादन, लोकल मार्केट, लोकल सप्लाय चेन याचंही महत्त्व समजलं आहे. लोकलनेच आपल्या मागण्यांची पूर्तता केली आहे. आपल्याला या लोकलनेच वाचवलं आहे. त्यामुळे लोकल फक्त गरजच नाही तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. लोकलला आपला जीवनमंत्र बनवावंच लागेल, हे आता वेळेने आपल्याला शिकवलं आहे.
त्यामुळे चला तर मग माझ्या सोबत तुम्हीही या दिपावलीची खरेदी आपल्या कोपरगांव बाजारपेठेत करुया आणि आपल्या कोपरगांवची अर्थ व्यवस्था मजबूत करून आपल्या कोपरगांव शहरातील व्यावसायिकांना हातभार लावूया असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *