
कोपरगाव प्रतिनिधी:-
“स्थानिक के. जे. सोमैया व के. बी. रोहमारे महाविद्यालयात कोपरगाव तालुक्याचे माजी आमदार के. बी. रोहमारे जन्मशताब्दीचे (१९२२-२०२२) औचित्य साधून राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा यावर्षी मंगळवार दि. ७ फेब्रुवारी, २०२३ रोजी भव्य प्रमाणात संपन्न होणार आहे.” अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष, अशोकराव रोहमारे व सचिव ऍड. संजीव कुलकर्णी व प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी केले.
महाविद्यालयाच्या साकरबेन सभागृहात दि. ७ फेब्रुवारी, २०२३ स. १० वा. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक श्री. अमोल बागुल यांच्या शुभहस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार असून या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील ५० पेक्षा जास्त स्पर्धक सहभागी होणार आहेत. अशी माहिती वक्तृत्व स्पर्धेचे संयोजक प्रो. (डॉ.) जे. एस. मोरे व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रो. (डॉ.) व्ही. सी. ठाणगे यांनी दिली.
स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या सांघिक संघास के. बी. रोहमारे स्मृति-करंडक, कायमस्वरूपी सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविले जाणार आहे. तर वैयक्तिक प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या स्पर्धकास रु. ९०००/-, द्वितीय स्पर्धकास रु.७०००/- तर तृतीय स्पर्धकास रोख रु. ५०००/- असे पारितोषिक देऊन गौरविले जाणार असून यावर्षी के. बी. रोहमारे यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने उत्तेजनार्थ रुपये १०००/- ची पाच पारितोषिके दिली जाणार आहेत. स्पर्धेसाठी विषय आहेत –
१. माजी आमदार के. बी. रोहमारे : कार्य आणि कर्तृत्व
२. चला जाणू या नदीला !
३. वेड मोबाईलचे : विस्मरण भविष्याचे
४. पर्यावरण बदल : शेतकरी हतबल.
हे विषय असून स्पर्धकाने त्यापैकी एका विषयावर बोलायचे आहे. अशी माहिती संस्थेचे विश्वस्त श्री. संदिपराव रोहमारे यांनी दिली.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संयोजक, समन्वयक, संयोजन समितीचे सदस्य प्रो. (डॉ.) के. एल. गिरमकर, प्रो. (डॉ.) एस. आर. पगारे, प्रो. (डॉ.) बी. बी. भोसले, प्रो. (डॉ.) व्ही. डी. आवारी, उपप्राचार्य प्रा. बी. आर. सोनवणे, डॉ. गणेश देशमुख, डॉ. एस. के. बनसोडे व महाविद्यालयातील सर्व सेवक प्रयत्नरत आहेत.
अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी
प्रो. (डॉ.) जे. एस. मोरे : ९८३४३१४३६७
प्रो. (डॉ.) व्ही. सी. ठाणगे : ९८२२६७१७४५
या क्रमांकावर संपर्क साधावा.
