


कोपरगाव प्रतिनिधी:-
प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ आयोजित ‘जागर स्त्री शक्तीचा – नवरात्रौत्सव २०२२’ कार्यक्रमात आज सातव्या दिवशी नृत्य स्पर्धा पार पडल्या. यावेळी मंडळाच्या अध्यक्षा मा.सौ. पुष्पाताई काळे उपस्थित राहिल्या.




यावेळी सहभागी स्पर्धकांनी गरबा व देवीच्या गाण्यांवर उत्कृष्ट नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तसेच श्री स्वामी समर्थ महिला मंडळाच्या महिलांनी देवीचे पाठ सादर केले.
