२१/०९/२०२२ रोजी तहसिल कार्यालय येथे महा ई फेरफार अदालत:- तहसीलदार विजय बोरुडे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा दिनांक १७ सप्टेंबर २०२२ ते दि.०२ ऑक्टोबर २०२२ पर्यंत या कालावधीत सेवा पंधरवाडा राबविण्याचे शासनाने निश्चित केलेले आहे. यामध्ये महा ई फेरफार अदालत दि.२१/०९/२०२२ रोजी तहसिल कार्यालय कोपरगांव येथे आयोजीत केलेली आहे. त्यामध्ये तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी उपस्थित राहुन १५ दिवसांपेक्षा जास्त प्रलंबीत फेरफार निर्गत करण्याचे कामकाज करणार आहेत.
तालुक्यातील सर्व शेतकरी यांना अहवान करण्यात येते की, १५ दिवसापेक्षा जास्त कालावधी प्रलंबित फेरफार असतील तर आपलेकडील आवश्यक त्या पुराव्यांसह दि. २१/०९/२०२२ रोजी तहसिल कार्यालय कोपरगांव येथे उपस्थित राहावे.असे आवाहन तहसीलदार विजय बोरुडे यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *