के.जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी साक्षी गाडे हिची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
सुरत (गुजरात) येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सुवर्णपदक प्राप्त असून के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी साक्षी गाडे हिने महत्त्वाची भूमिका बजावली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सुवर्णपदक प्राप्त करून दिले. तिची चेन्नई येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कोपरगाव तालुका व अहमदनगर जिल्यातून अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्तरावर धडक मारणारी कु. साक्षी गाडे ही पहिली खेळाडू ठरली आहे. साक्षी गाडे हे की के जे सोमैया महाविद्यालयांमध्ये टी. वाय. बी. कॉम या वर्गात शिकत आहे व ती सी.ए चे शिक्षणही घेत आहे.
साक्षी गाडे ही कोपरगाव येथील एस.टी आगारातील वाहतूक नियंत्रक श्री. संजीव गाडे यांची कन्या असून तिने जिल्हा व राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत विविध पारितोषिके प्राप्त केलेले आहेत.
कु. साक्षी गाडेला या उतुंग यशाबद्दल कोपरगाव व परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री. अशोकराव रोहमारे, सचिव मा अ‍ॅड. संजीव कुलकर्णी, सदस्य श्री संदीप रोहमारे, प्राचार्य डॉ. बी एस यादव, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे आदींनी तिचा सत्कार करून तिला पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. साक्षी गाडे हिला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ.सुनील कुटे यांचे मार्गदर्शन लाभले.

फोटो ओळी:- कु. साक्षी गाडे हिचा सत्कार करतांना कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. अशोकराव रोहमारे व इतर मान्यवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *