
कोपरगाव प्रतिनिधी:-
जागर देशभक्तीचा
७५ वर्षांपूर्वीचा काळ आठवला तरी अंगावर रोमांच येतात.
आपल्याला स्वातंत्र्य उपभोगता यावे म्हणून प्राणार्पण करणारे देशभक्त यांना शत शत नमन करण्याचा आणि गर्वाने भारतमातेचा आसमंत दुमदुमून जयघोष करण्याचा उत्सव म्हणजेच १५ ऑगस्ट होय. यावर्षी आपल्याला संधी आहे या वीरांचे स्मरण करून त्यांच्या प्रति आदर आणि ऋण व्यक्त करण्याची.
ही संधी सोडू नये ही कळकळीची नम्र विनंती.
देशभक्त नागरिकानो १५ ऑगस्ट रोजी आपण फक्त इतकेच करा
तहसीलदार कार्यालय , पोलीस स्टेशन , व्यापारी महासंघ , समता परिवार , लायन्स परिवार आयोजित स्वातंत्र्य रॅली मध्ये उस्फुर्त पणे सहभागी व्हा .
आणि साक्षीदार व्हा 300 मीटर लांबीच्या भव्य दिव्य ध्वज यात्रेचे .
*साक्षीदार व्हा ७५ फूट उंचीवर होणाऱ्या न भूतो ना भविष्यती ध्वजारोहण कार्यक्रमाचे
रॅली मार्ग राष्ट्रपिता म.गांधी पुतळा ते निवारा
आपला सहभाग हा आपल्यालाच आनंद देईल देशाप्रती कर्तव्य निभावल्याचा.
चला तर मग सज्ज व्हा
१५ ऑगस्ट सकाळी १० ते १२वाजेपर्यंत,
आपले फक्त २ तास देशाप्रती कर्तव्य निभावण्यासाठी
आपले नम्र-समस्त कोपरगावकर नागरिक.
