
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील लक्ष्मीनगर, साईनगर, विवेकानंदनगर, राममंदिर रस्ता व मागील परिसर, इंगळेनगर सोसायटी, हनुमाननगर, सेवानिकेतन जवळील बालाजी निकेतन, बालाजी अंगण, बोरावके चाळ, इंदिरानगर मधील संतोषी माता परिसराचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार शुभम कैलास काळे यांनी दिले आहे.
त्यांनी प्रभाग क्रमांक ११ मधील सर्व नागरिकांना आश्वासीत केले की, आज मी तुमच्या समोर उभा आहे—एक उमेदवार म्हणून नव्हे तर तुमचा मुलगा, तुमचा शेजारी, तुमच्या विश्वासाचा माणूस म्हणून. आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी, सर्व सामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी आणि आपल्या परिसराच्या प्रगतीसाठी आपण एकत्र येण्याची वेळ आली आहे.

मी आपला प्रभाग स्वच्छ आणि सुंदर करेल प्रभागातील रस्त्यांची नियमित स्वच्छता,कचरा व्यवस्थापन सुधारणा,सर्व गल्ली-बोळांत स्वच्छता कर्मचारी व वेळेवर कचरा संकलन, पिण्याच्या पाण्याची शाश्वत व्यवस्था,पाणीपुरवठा वेळेवर व समान प्रमाणात मिळावा यासाठी प्रयत्न,गळती व पाइपलाइन दुरुस्तीची तात्काळ उपाययोजना
, उत्तम रस्ते आणि पायाभूत सुविधा,खड्डेमुक्त रस्ते आणि वाहतुकीस सोयीस्कर मार्ग,स्ट्रीटलाइटची दुरुस्ती व नवीन दिवे बसविण्याची योजना,नालेसफाई व पावसाळी पाण्याचा ड्रेनेज सुधारणा, युवांसाठी रोजगार व क्रीडा सुविधा,युवकांसाठी कौशल्य विकास उपक्रम,प्रभागात क्रीडांगण, व्यायाम शाळा व मैदाने विकसित करणे, माता-भगिनींसाठी सुरक्षित व सोयीस्कर उपक्रम,सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे,महिला बचत गटांना मदत आणि उपजीविका योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवा केंद्र,आरोग्य तपासणी शिबिरे,ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची जागा, उद्यान आणि योगा-सेंटर आदी महत्वाचे कामे मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध असेल.
असे सांगत प्रभाग क्रमांक ११ चा विकास, पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा हेच माझे ध्येय.
तुमचा विश्वास, तुमचे सहकार्य आणि तुमचे आशीर्वाद मिळाले तर प्रभागाला आदर्श प्रभाग बनविण्यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करेन असे सांगितले.
