
कोपरगाव प्रतिनिधी:-
तालुक्यातील वारी येथील नाद संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांची एप्रिलमध्ये अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने संगीत परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षांचा ऑनलाईन निकाल नुकताच जाहीर झाला असून यात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून पाच वर्षाच्या उज्वल निकालाची परंपरा कायम राखली असल्याची माहिती विद्यालयाचे संचालक शंकर गोंडे यांनी दिली.
या निकालामध्ये गायन विषयात प्रारंभिक ते प्रवेशिका पूर्ण या परीक्षेत प्रांजल सुभाष डांगे, पायल संदीप गोंडे, भक्ती बाबासाहेब शिंदे, वैष्णवी साहेबराव टेके, निलेश सुरेश चव्हाण, यश शरद भड, प्राजक्ता गोविंद सोनवणे, किरण त्रंबक जाधव यांनी प्रथम श्रेणी तर हार्मोनियम या विषयात शितल बबन सूरभैय्या, संकेत रमेश काळोखे, यथार्थ कैलास तिवारी, समीक्षा गोरख नेवगे यांनीही प्रथम श्रेणी मिळवली. तबला विषयात मध्यम प्रथम या परीक्षेत साहिल शिवाजी क्षीरसागर, राघव चंद्रकांत पाटील यांनी यश संपादन केले तर विद्यालयाचे आकर्षण बासरी या विषयात स्वाती बबन सूरभैय्या हिने विशेष योग्यता मिळवली. या सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाचे संचालक शंकर गोंडे यांचे मार्गदर्शन लाभले
