
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :-
सर्व समाजाप्रमाणेच आदिवासी बांधवांना देखील शिक्षण, आरोग्य तेसच शासनाकडून दिल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळवून देवून आदिवासी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे श्री. साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त कोपरगाव येथे आदिवासी महादेव कोळी युवक संघटना यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमप्रसंगी ना. आशुतोष काळे बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की, मला मतदार संघाची सेवा करण्याची संधी मिळाली यामध्ये आदिवासी बांधवांचा देखील मोठा सहभाग आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच सर्व समाजाला सोबत घेवून वाटचाल करीत आहे. आदिवासी समाजाच्या मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण, सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगत कोपरगाव येथे आदिवासी भवन उभारण्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी सर्व आदिवासी बांधवांना आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक मंदार पहाडे, संदीप पगारे, हाजीमेहमूद सय्यद, फकीर कुरेशी, रमेश गवळी, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, राहुल देवळालीकर, बाळासाहेब रुईकर, संदीप कपिले, इम्तियाज अत्तार, आकाश डागा, सचिन गवारे, राजेंद्र आभाळे, गणेश बोरुडे, सोमनाथ आढाव, राजेंद्र जोशी, भाऊसाहेब भाबड, शिवाजी कुऱ्हाडे, अमित आगलावे, चंद्रकांत सोळसे, सुरेश कांगुणे, नंदकुमार खांडगे, आकाश सोळसे, राहुल राठोड, विशाल गुंजाळ, राहुल कहार, कैलास माहूरकर, प्रदीप मेढे, शरद शिंदे, आदींसह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
