
कोपरगाव प्रतिनिधी:-
सद्गुरू गंगागीरीजी महाराज यांच्या,” अखंड हरींनाम सप्ताह’ कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे दि.०२ ऑगष्ट पासून संपन्न होत असून त्याचा ध्वजारोहण सोहळा महंत रामगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते गुरुवार दि.२१ जुलै सकाळी ११.३० वाजता संपन्न झाला आहे अखंड हरिनाम सप्ताह’ हा वारकरी सांप्रदायिक धार्मिक सामूहिक उपासना करण्याचा एक प्रकार आहे.



इंग्रज राजवटीत ग्रामस्थांची अन्नाविना उपासमार होत असलेल्या प्रतिकूल कालखंडात,”लेणे को हरींनाम और देणे को अन्नदान” हा जप करत तत्कालीन महंत सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांनी सुरु केलेल्या या वारकरी संप्रदायामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाला मोठे महत्त्व आहे.त्यामुळे या काळात हा सप्ताह नावारूपास आला आहे.


सदर प्रसंगी रामेशगिरीजी महाराज,ह.भ.प.मधुकर महाराज,विवेकानंद जी महाराज,श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे,गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,ओम शांतीच्या सरला दीदी,राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,संजीवनी कारखान्याचे संचालक विवेक कोल्हे,जिल्हा परिषदेचे माजी गटनेते केशवराव भवर,सुरेश चव्हाणके,कोपरगाव पंचायत समितीच्या माजी सभापती अनुसया होन,मधुकर टेके,भाजप कोल्हे गट अध्यक्ष साहेबराव रोहोम,सप्ताह आयोजन समितीचे अध्यक्ष सुधाकर रोहोम,भाजप माजी तालुकाध्यक्ष शरद थोरात,सेनेचे तालुकाध्यक्ष शिवाजी ठाकरे,संजय काळे,कडूभाऊ काळे,कमलाकर कोते,माजी नगराध्यक्ष दिनेश परदेशी,श्री अभंग,संचेती नंदू संचेती,साहेबराव सोमसे,भाऊराव सोमासे,तुकाराम गोंदकर,गुरुसेवा ब्रास बँडचे संचालक चौस,आकाश नागरे,कोकमठाण ग्रामपंचायत सरपंच संतोष जाधव,अविनाश गलांडे,उषाताई जोशी,संभाजी रक्ताटे आदी प्रमुख मान्यवरांसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.कान्हेगाव येथील गोदावरी रिफायनरी ऑरगॅनिक कंपनीच्या वतीने समीर सोमैय्या यांनी ०७ लाख रुपयांची तरशिर्डी येथील साई सेवा हेल्पिंग हँडच्या वतीने ०२ लाख ५१ हजारांचा तर किरण अशोक देवकर यांनी आपल्या वडिलांच्या समरणार्थ ३१ हजार रुपयांचा धनादेश प्रदान महंत रामगिरीजी महाराज यांचेकडे सुपूर्त केला आहे.त्यावेळी नाशिक जिल्ह्यातील डोंगरगाव येथील ग्रामस्थांनी सप्ताहाची मागणी केली आहे.या प्रसंगी महंत रमेशगिरीजी महाराज,विवेकानंदजी महाराज,सरला दीदी,विवेक कोल्हे,राजेश परजणे,कमलाकर कोते,वैजापूरचे संतोष जाधव,सप्ताह समिती अध्यक्ष सुधाकर रोहोम,कोपरगाव बाजार समितीचे माजी सभापती संभाजी रक्ताटे,शरद थोरात,आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजश्री पिंगळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार संभाजी रक्ताटे यांनी मानले आहे.
