
कोपरगाव प्रतिनिधी:-
महाराष्ट्रात राजकीय सत्तासंघर्ष सर्वाच्च न्यायालयात सुरु असताना आमदार आदित्य ठाकरे यांनी जनतेच्या न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रे नंतर आता तीन दिवसांची शिवसंवाद यात्रा करणार आहेत. आदित्य ठाकरेंच्या मुंबईतील सभांना शिवसैनिकांनी जोरदार प्रतिसाद दिल्यानंतर त्यांची शिवसंवाद यात्रा महाराष्ट्रातील जनता आणि शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी सुरु झाली आहे. तीन दिवसीय शिवसंवाद यात्रेच्या पहिल्या टप्प्यात भिवंडी, नाशिक, दिंडोरी,औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीमधील शिवसैनिक आणि नागरिकांशी आदित्य ठाकरे संवाद साधतील. मुंबईतील आदित्य ठाकरेंच्या सभांना शिवसैैनिकांनी चांगला प्रतिसाद दिला.आदित्य ठाकरे सध्या पक्ष बांधणीसाठी जोरदार तयारी करत आहे.२३ जुलै रोजी अहमदनगर जिल्ह्यात शिव संवाद यात्रेला प्रारंभ होणार आहे.शिर्डी लोकसभेचे खासदार सदाशिव लोखंडे शिंदे गटात सहभागी झाल्याने शिवसैनिक नाराज झाले आहे.सध्या उत्तर नगर जिल्ह्यात शिवसैनिक पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या गटात मोठ्या संख्येने आहे.खासदार जरी शिंदे गटात गेले असले तरी उत्तर नगर जिल्ह्याला शिंदे गट प्रभावी करु शकला नाही.त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या शिर्डी येथील शिवसंवाद यात्रेला मोठा प्रतिसाद मिळणार आहे.या शिवसंवाद यात्रे निमित्ताने २३ जुलै शनीवार रोजी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे दुपारी १ वाजता तर शिर्डी येथे शिर्डीत श्री.साईबाबांचे दर्शन घेवुन ३:३० वाजता हाँटेल गाँर्डिया या ठिकाणी शिवसैनिक आणि पदाधिकार्याशी आमदार आदित्य ठाकरे संवाद साधणार आहे.या शिवसंवाद यात्रेला शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन उत्तर नगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे त्याच बरोबर अहमदनगर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी केले आहे.
