
कोपरगाव प्रतिनिधी:-
स्वातंत्र्य पूर्व काळात क्रांतिकारी चळवळ उभारताना क्रांतिगुरु लहुजी साळवे यांनी दिलेला राष्ट्रवादाचा मूलमंत्र देशातील तमाम बहुजन वर्गाला प्रेरणादायी असून लहुजींच्या प्रखर राष्ट्रवादाचा देशवासियानी आदर्श घ्यावा असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी व्यक्त केले
लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने लहुजी साळवे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला परिट महासंघ व मनसे नेते सुनील फंड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोक स्वराज्य आंदोलनाचे युवा शहर अध्यक्ष सुजल चंदन शिव यांनी केले तर आभार रंगनाथ मरसाळे यांनी व्यक्त केले
या वेळी बोलताना सुनील फंड पुढे म्हणाले की छ शिवाजी महाराज यांनी बहुजन समाजा तील मावळ्यांना एकत्र करून स्वराज्य उभे केले आदर्श डोळ्या समोर ठेऊन क्रांतिगुरु लहुजी साळवे यांनी अनेक बहुजन एकत्र केले या वेळी बोलताना पोळ पुढे म्हणाले की लहुजींनी क्रांतिकारकाना प्रखर राष्ट्रवादाचे धडे दिले “जगेन तर देशासाठी व मरेन तर देशासाठी अशी भीष्म प्रतिज्ञा करून देशासाठी आजन्म अविवाहित राहून क्रांती कार्यासाठी अनेकांना प्रेरणा दिली
तर अकबर शेख म्हणाले की बहुजनांच्या शिक्षणासाठी महात्मा फुले यांनी उभारलेल्या क्रांती कार्यात लहुजींचा मोठा वाटा असून मुक्ता हिला शिक्षण देऊन प्रस्थापितांना धक्का दिला यावेळी मुस्लिम समाजाचे अकबर शेख, घटनाकार मैत्री संघाचे गौतम बनसोडे, विशाल आव्हाड,मनोज आवारे, पत्रकार बिपीन गायकवाड, देवराम पगारे, विजय त्रिभुवन, मनोज शिंदे राजू उशीर आदी मान्यवर उपस्थित होते.
