गोदावरी पेट्रोल पंप ते कोठारी घर व अनिकेत भडकवाडे घर ते निवारा रस्त्याचे नूतनीकरण करा राष्ट्रवादीचे मुख्याधिकार्‍यांना निवेदन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव शहरातील गोदावरी पेट्रोल पंप ते कोठारी घर व अनिकेत भडकवाडे घर ते निवारा या दोन रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे त्यासाठी या दोनही रस्त्यांचे नूतनीकरण करा अशा आशयाचे निवेदन नुकतेच कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना देण्यात आले आहे.

        दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, दोन्ही रस्त्यांच्या दुरावस्था झाल्यामुळे या परिसरातील नागरिकांची मोठी अडचण होत आहे. विशेषता महिला व ज्येष्ठ नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दोन वर्षानंतर पूर्ण क्षमतेने शाळा महाविद्यालय सुरू झाले आहेत. त्यामुळे या रस्त्याने शाळेतील विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे नागरिक या रस्त्याने येत नाही त्याचा व्यवसायावर परिणाम होतो. पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पाणी साचून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे .या रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी श्री साईबाबा संस्थान च्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नामदार आशुतोष काळे यांना देखील नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. कोपरगाव शहरातील अनेक रस्त्यांची कामे झाली आहेत त्याप्रमाणे नागरिकांना होत असल्या त्रासाची दखल घेऊन या रस्त्यांचे देखील नूतनीकरण करावे असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी कृष्णा आढाव,अनिरुद्ध काळे,सोमनाथ आढाव, संतोष शेजवळ .राजेंद्र सावतडकर राजेंद्र पाखले ,अनिकेत भडकवाडे, ऋषिकेश भडकवाडे, अशोक वाणी, दीपक वाणी, संदीप भडकवाडे, सखाराम खोकले, चेतन आढाव, निलेश भुजबळ, मयूर गायकवाड, अनिल आहेर, प्रीतम गंगवाल, प्रमोद पवार, किसन वायकर, संदीप म्हस्के, चांगदेव अनर्थे, नामदेव शेंडगे, सचिन कुटाफळे, बाबासाहेब भंडारे, अनिल सोनवणे, अविराज भंडारे, वसंतराव विभुते, साईदास कोळपकर, प्रसाद महापुरे, निलेश नाईक, रियाज शेख, पियुष अग्रवाल, दीपक बर्डे, अमोल जाधव, रोशन शेजवळ आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *