
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव तालुक्यातील सहकारी सोसायट्यांमध्ये प्रगतीपथावर असणाऱ्या मढी खुर्द सोसायटीच्या अध्यक्षपदी काळे गटाचे सुधाकर कुऱ्हाडे व उपाध्यक्षपदी प्रकाश आभाळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
मढी खुर्द सोसायटीची निवडणूक मागील महिन्यात नेहमीप्रमाणे बिनविरोध पार पडली आहे. या सोसायटीवर मागील अनेक वर्षापासून काळे गटाची सत्ता आहे. शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या सोसायटीचा तालुक्यात मोठा नावलौकिक आहे. या सोसायटीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली असून अध्यक्षपदासाठी सुधाकर माधवराव कुऱ्हाडे व उपाध्यक्षपदासाठी प्रकाश संतु आभाळे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र रहाणे यांनी अध्यक्षपदी सुधाकर कुराडे उपाध्यक्षपदी प्रकाश आभाळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. सेक्रेटरी संजय दिघे यांनी निवडणूक कामी सहकार्य केले.
यावेळी काळे गटाचे ज्येष्ठ नेते श्रीधर आभाळे, मोहनराव आभाळे, सोपानराव गवळी, भाऊसाहेब कुऱ्हाडे, उत्तमराव कुऱ्हाडे, वसंतराव आभाळे, दत्तात्रय गवळी, नवनिर्वाचित संचालक विजूनाना आभाळे, साहेबराव आभाळे, सुहास आभाळे, विजयराव आभाळे, अजय गवळी, एकनाथ आभाळे, शंकर आभाळे, सुखदेव भागवत, पोपटराव गोसावी, सौ. पुष्पा आभाळे, सौ.गयाबाई गवळी आदी मान्यवरांसह सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित अध्यक्ष सुधाकर कुऱ्हाडे व उपाध्यक्ष प्रकाश आभाळे यांचे माजी आमदार अशोकराव काळे व नामदार आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे संचालकांनी पुष्पहार घालून अभिनंदन केले आहे. सोसायटीच्या अध्यक्षपदी काम करण्याची संचालक मंडळाने दिलेल्या संधीचे सोने करून श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना सोबत घेऊन सोसायटीला प्रगतीच्या दिशेने वेगाने घेऊन जाणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुधाकर कुऱ्हाडे यांनी सांगितले आहे.
