कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात गोदावरी नदीवर पूल उभारून व महत्वाचे रस्त्यांचे प्रश्न सोडवून मतदार संघातील दळणवळणाचा अत्यंत महत्वाचा प्रश्न सोडविला मात्र मागील काही वर्षात रस्ते दुरुस्तीचा मोठा अनुशेष निर्माण झाल्यामुळे मतदार संघाचा विकास खुंटला होता. मतदार संघातील अनेक रस्ते नकाशावर घेवून त्या रस्त्यांना महाविकास आघाडी सरकार कडून निधी मिळविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून मतदार संघात रस्त्यांचे जाळे निर्माण करून मतदार संघाचा सर्वांगीण विकास साधणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.
कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द येथे मुख्य लेखाशिर्ष २५१५ ग्रामविकास कार्यक्रम अंतर्गत २५ लक्ष रुपये निधीतून सुनील भागवत घर ते किसन आभाळे घर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन तसेच १४ व्या वित्त अयोगातून दशक्रिया विधी परिसर सुशोभीकरण, दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत भूमिगत गटार बांधणे, श्री साईबाबा सार्वजनिक वाचनालय व ग्रामसंघ महिला बचत गट कार्यालयाचे लोकार्पण नुकतेच आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहनराव आभाळे होते.
याप्रसंगी पुढे बोलतांना ते म्हणाले की, मतदार संघातील रस्त्यांच्या प्रश्नाबरोबरच वीज आणि पाणी हे प्रश्न देखील महत्वाचे असून त्याबाबत करीत असलेल्या पाठपुराव्यामुळे या कामांसाठी कोरोनाच्या संकटात देखील निधी उपलब्ध होवून हे प्रश्न मार्गी लागत आहेत.मतदार संघातील विकासकामांचे प्रश्न सोडवीत असतांना महिलांचे सक्षमीकरण व ग्रामीण भागातील महिलांचा विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील माता भगिनींना जिल्हा परिषद, पंचायत समिती व बचत गटाच्या माध्यमातून विविध प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण देवून त्यांच्या अडचणी सोडवून या माता भगिनींना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या गावातील वाड्या वस्त्या व भाऊबंदकी व अंतस्थ वाद बाजूला ठेवून गावाच्या विकासासाठी युवकांनी व सुशिक्षित नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना केले.
यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने, उपसभापती अर्जुन काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, पंचायत समिती सदस्य सौ. अनुसयाताई होन, पंचायत समिती अभियंता उत्तम पवार, रोहिदास होन, मोहनराव आभाळे, रंभाजी आभाळे, सोपानराव आभाळे, माजी सरपंच सौ. वैशालीताई आभाळे, सदस्य सौ. मनीषाताई आभाळे, सुनील मोकळ, भाऊसाहेब आभाळे, वसंतराव आभाळे, उत्तमराव कुऱ्हाडे, प्रमोद आभाळे, कचेश्वर डूबे, केशव विघे, नामदेव गवळी, प्रविण निंबाळकर, आप्पासाहेब गवळी, प्रकाश आभाळे, रवींद्र गवळी, बिपीन गवळी, राजेंद्र गायकवाड, हिराबाई गवळी, श्रीधर आभाळे, माधवराव आभाळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो ओळ- मढी खुर्द येथे मुख्य लेखाशिर्ष २५१५ ग्रामविकास कार्यक्रम अंतर्गत २५ लक्ष रुपये निधीतून रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन प्रसंगी आमदार आशुतोष काळे मान्यवर.
