आनंदाच्या संजीवनीच उमलतं नेतृत्व:- विवेक भैय्या कोल्हे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
गुरु शुक्राचार्याची भुमी कोपरगाव बेट आणि याच भुमीत मदत, गरज आणि त्याच दायीत्वावुन काम करणारी संजीवनी असुन बी.ई. सिव्हील अभियांत्रीकीचे शिक्षण घेऊन त्याच तडफेने सामाजिक क्षेत्रात काम करणारं उमलतं नेतृत्व म्हणजे विवेक बिपीनदादा कोल्हे.
त्यांनी गोर-गरीब, वंचितांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याच्या व्रताचा वारसा आपले आजोबा माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या कडून घेतला आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन काम करण्याचा विडा उचलला आहे. त्यांना वडील बिपीनदादा आणि आई तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांचाही तितकाच सपोर्ट आहे. कोपरगाव ग्रामीण अर्थकारणाची आर्थिक घडी_ नाडी सुरळीत करण्यात कोल्हे कुटुंबियांचे मोठे योगदान आहे. आजवर प्रत्येक संकटात संजीवनीच सर्वप्रथम धावून आलेली आहे.
संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष होऊन विवेक कोल्हे यांनी आपल्या कार्याची सुरुवात केली. ते जेव्हा जेव्हा आजोबा शंकरराव कोल्हे यांच्याशी वार्तालाप साधत त्या त्या वेळी आजोबांच्या तरुणपणांत असणाऱ्या स्वभाव वैशिष्ट्यावर ते सातत्याने लक्ष्य केंद्रीत करत., त्यांच्याकडून ते याबाबतची दिशा जाणून घेत.
विवेक कोल्हे यांनी वंचितांचे अश्रू पुसण्यांसाठी सन् २०१८ मध्ये सर्वधर्मिय सामुदायीक विवाह सोहळ्याची संकल्पना सर्वप्रथम रुजवली आणि पहिल्याच वर्षी त्यांनी २६ जोडपी विवाहबद्ध करून त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण केले.
आज नाही म्हटले तर अवघ्या २५-३० लोकांच्या उपस्थीतीत लग्न सोहळा उरकायचा म्हटलं आणि जे कष्टकरी दीन-दलित, गोर-गरीब, शेतकरी शेतमजूर आहेत, त्यांना हलक्या हाताने दीड ते दोन लाख रुपयांचा खर्च येतो. या खर्चाची पैशांची जुळवाजुळव कशी करायची हे एक संकटच असतं त्यासाठी विवेक कोल्हे यांनी सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन सन २०१८ मध्ये सर्वप्रथम सुरु केले. त्यानंतर पुढच्याच २०१९ मध्ये त्यांनी ४१ जोडपी विवाहबद्ध केली. त्यांना संसारपयोगी साहित्य विनामुल्य भेट देऊन सौभाग्य मांगल्याचं प्रतीक सोन्याचे मणी मंगळसुत्रही दिलं. लग्न सोहळा म्हनजे आनंद. त्यात पाहुण्या मंडळींची बडदास्त, वराची मिरवणुक, बँडबाजा, घोडागाडी, फटाक्यांची आतषबाजी, सर्वधर्मियांच्या विवाहपद्धती त्यानुरूप सर्व व्यवस्था, हिंदु रिती रिवाज आणि लग्नासाठी जमा होणाऱ्या वऱ्हाडी मंडळीच्या भोजनाची व्यवस्था, तर शुभविवाह सोहळ्यास सर्वधर्मिय संत महंतांचे आर्शिवादही देण्यांबाबत त्यांचे नियोजन उत्तम असते.
याशिवाय दुष्काळ हा अहमदनगर जिल्हयाच्या पाचवीला पुजलेला आहे. नाम फाऊडेशन जिरायत भागातील शेतकऱ्यांच्या जीवनांत पाण्याचा आनंद निर्माण करण्यासाठी झटत असते म्हणुन नाम फाऊडेशनला आर्थिक मदतही ते देतच असतात, हे एक अपरूपच आहे.
विवेक कोल्हे यांची कमी वयातील दिव्यदृष्टी मोठी आहे. याशिवाय युवकांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी ते समाजप्रबोधनकार इंदोरीकर महाराज देशमुख यांच्या कितनसेवेतून सतत पुढाकार घेतात.
अभियांत्रीकीचे शिक्षण आणि घरचा सामाजिक कार्याचा वसा त्यांना या कामात नेहमीच मदत करत आलेला आहे. पर्यावरण संतुलन बिघडत असल्यांने वृक्ष लागवड करून ती जोपासने हा छंद त्यांना आहे. साखर कारखानदारी बरोबरच इथेनॉल, औषधी उत्पादन आणि भावीकाळात निर्माण होणाऱ्या आव्हानांना सामोरे कसे जायचे याचे भविष्यकालीन प्लॅन त्यांच्या मनात सतत घोंगावत असतात त्यासाठीचा अभ्यास ते सतत करत असतात.
युद्धात लक्ष्मणाला शक्ती लागली त्यासाठी हनुमानाने संजीवनी पर्वत उचलुन आणला, तद्वत युवा नेते विवेक कोल्हे हे कोपरगाव विधानसभा मतदार संघात निर्माण होणाऱ्या अडीअडचणी, संकटावर मात करण्यासाठी सतत पुढाकार घेत असतात., असा हा युवानेता आणि विचारांची दूरदृष्टी ठेऊन वाटचाल करणारं नेतृत्व हिऱ्याच्या पैलू प्रमाणे तयार होत आहे. त्यातूनच त्यांना अहमदनगर जिल्हा सहकारी बँक, इफको नविदिल्ली, उस तंत्रज्ञानातील देश पातळीवर.. जास्तीत जास्त हेक्टरी उत्पादन, संशोधन देणाऱ्या संस्थेचे उपाध्यक्ष म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली आहे. विवेक कोल्हे यांनी शेकडो सामजिक उपक्रम हाती घेऊन ते यशस्वी करून दाखवले आहे.
सन २०२० आणि २०२१ कोरोना महामारीमुळे आपण आपल्या जवळची अनेक मौल्यवान माणसे गमावली त्यांच्या उपचारासाठी अनेकांनी केविलवाण्या परिस्थीतीला तोंड देत धैर्याने सामोरे गेले, कोरोना आपत्तीमुळे अनेकांना विवाहसोहळे करण्याला मर्यादा आल्या. शेतकरी राजा आधी कोरोना आणि नंतर शेतीच्या उत्पादनामुळे हतबल झाला. त्यांच्यासाठी विवेक कोल्हे यांचा सर्वधर्मिय सामुदायीक विवाह सोहळा एक आशेचा किरण ठरला आहे, त्यांचे हे कार्य अनेकांना प्रेरणा देणारे आहे.
कोरोना आपत्तीमध्येही त्यांनी संजीवनी डेडीकेटेड कोवीड सेंटर आत्मा मालिक येथे उघडुन त्यातून हजारो कोविड ग्रस्तावर विनामुल्य उपचार केले., याशिवाय ५०० खाटांचे व ४० ऑक्सीजन बेडची सुविधा त्यांनी निर्माण केल्याने या संकटाला धैर्याने तोंड देता आले. एकीकडे कोरोना, दुसरीकडे हाताला काम नाही आणि घरात खाणारी तोंडे जादा अशाही परिस्थीतीत त्यांनी विनामुल्य भोजनाची व्यवस्था केली आणि हजारो व्यक्तींचे आर्शिवाद घेतले. खरोखरच विवेक कोल्हे यांचे कार्य नावाप्रमाणे संजीवनी देणारे आहे. भविष्यात त्यांच्या मनातील संकल्पना दृढ होण्यांसाठी तुम्हा-आम्हा सर्वांचे आयुष्य त्यांना लाभो हीच यानिमीत्ताने प्रार्थना २७ मे २०२२ च्या सामुदायिक विवाह सोहळ्यात १७ जोडपी विवाहबद्ध होत आहेत त्यांच्या संसारात आनंदाची संजीवनी निर्माण होवो हिच मनोकामना, या विवाह सोहळ्यासाठी सर्वांनी यायचं.
आप्पासाहेब दवंगे,
उपाध्यक्ष,
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, कोपरगाव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *