
कोपरगाव प्रतिनिधी:-
तालुक्यातील माहेगांव देशमुख येथील अनुसया दत्तात्रय पानगव्हाणे (७५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, तीन मुली,सुना नातवंडे असा परिवार आहे. त्या प्रगतशील शेतकरी दत्तात्रय पानगव्हाणे यांच्या पत्नी तर राजेंद्र पानगव्हाणे,भागवत पानगव्हाणे व माहेगांव देशमुख ग्रामपंचायतींचे सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्या निधनाबद्दल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे मँनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, सुमित कोल्हे आदींनी शोक व्यक्त केला.
