राष्ट्रसंत जनार्दन स्वामींनी राज्यात गुरूभक्ती जागवली:- स्नेहलता कोल्हे…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनीधी:-
कोपरगांव बेट आणि गोदावरीनदी काठचा परिसर हा संत महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला असून राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांनी श्रमदानाचे महत्व भाविकांमध्ये सतत कार्यरत ठेवुन त्यांनी राज्यात गुरूभक्ती जागृत ठेवली असे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांनी केले.
याप्रसंगी श्री संत सदगुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज समाधीस्थान व श्री काशिविश्वनाथ महादेव शैक्षणिक व गोपालन ट्रस्टचे मठाधिपती विश्वस्थ प. पू. रमेशगिरी महाराज यांचे जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे व सौ. स्नेहलता कोल्हे यांनी संतपुजन केले.
याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे संचालक शिवाजीराव वक्ते, बाळासाहेब वक्ते, सतिष आव्हाड, जनार्दन स्वामी आश्रमाचे अध्यक्ष दत्तात्रय बाळकृष्ण होळकर, उपाध्यक्ष विलास कोते, सचिव अंबादास अत्रे, विश्वस्थ त्रंबक पाटील, रामकृष्ण कोकाटे, अनिल जाधव, आशुतोष पानगव्हाणे, संदिप चव्हाण, अतुल शिंदे, शिवनाथ शिंदे, विजय रोहोम, भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्ता काले, भिमा संवत्सरकर, विष्णुपंत कोल्हे, डी पी मोरे, दिपक कोटमे, प्रदिप मोरे, गोंडे यांच्यासह पंचकोशीतील असंख्य भाविक व विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांनी कोपरगांव पंचकोशीत श्रमदानाला प्राधान्य देत अनेकांच्या जीवनांत आनंद निर्माण केला. आश्रमाचे माजी अध्यक्ष स्व. मोहनराव चव्हाण व त्रंबकेश्वर येथील भाउ पाटील यांनी जनार्दन स्वामींच्या कार्याची महती संपुर्ण महाराष्ट्र राज्यात पोहोचविण्यांसाठी अतोनात परिश्रम घेतले. सर्व आजी-माजी विश्वस्त व जनार्दन स्वामी परिवाराची साथ त्यांना मिळाली. प्रत्येकाच्या आयुष्यात गुरूपुजन महत्वाचा भाग असुन त्यामुळे जीवनाला दिशा मिळते. कोपरगांव बेट भागाला जनार्दन स्वामींच्या कार्याने नवसंजीवनी मिळाली असून गुरूपौर्णिमा व पुण्यतिथीला लाखो भाविक येथे नतमस्तक होवुन त्यांच्याप्रती श्रध्दा व्यक्त करतात. शेवटी संदिप चव्हाण यांनी आभार मानले.

फोटोओळी:-कोपरगांव
श्री संत सदगुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज समाधीस्थान व श्री काशिविश्वनाथ महादेव शैक्षणिक व गोपालन ट्रस्टचे मठाधिपती विश्वस्थ प. पू. रमेशगिरी महाराज यांचे जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे व सौ. स्नेहलता कोल्हे यांनी गुरूपौर्णिमेनिमीत्त संतपुजन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *