कोपरगांव प्रतिनीधी:-
तालुक्यातील जेउरकुंभारी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाचे कहार समाजाचे ताराचंद छोटुराम लकारे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणुक निर्णय अधिकारी काशिनाथ देशमुख यांनी काम पाहिले. जिल्हा सहकारी बँकेचे संचालक श्री. विवेकभैय्या कोल्हे यांनी कहार समाजाला ग्रामपंचायतमध्ये प्रतिनिधीत्व देवुन समाजाचा सन्मान केला आहे.
उपसरपंच पदासाठी ताराचंद लकारे यांच्या नावाची सुचना प्रदिप दिपकराव गायकवाड यांनी सुचना केली तर त्यास यशवंत विठठलराव आव्हाड यांनी अनुमोदन दिले. ग्रामपंचायत सदस्य गंगूबाई बाळासाहेब जाधव, वैशाली संदेश भोंगळे, अनिता संजय वक्ते, जालिंदर चव्हाण आदि उपस्थित होते.
सरपंच सुवर्णाताई सतिष पवार यांनी या निवडीबददल उपसरपंच ताराचंद लकारे यांचा सत्कार केला. सत्कारास उत्तर देतांना ते म्हणाले की, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व कोपरगांव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांना अभिप्रेत असलेला गांवचा विकास करून दाखवु.
सदरची निवड बिनविरोध होण्यासाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे संचालक शिवाजीराव वक्ते, बाळासाहेब वक्ते, मधुकरराव वक्ते, रिपाई नेते दिपकराव गायकवाड, विठठलराव आव्हाड, रमेश वक्ते, सतिष सुभाषराव आव्हाड, शिवाजी यादवराव वक्ते, भिमराज वक्ते, विजय रोहोम, अमोल दौंड, आण्णासाहेब चव्हाण, भाउसाहेब वक्ते, रिपाई यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी प्रदिप गायकवाड यांनी आभार मानले.

फोटोओळी:-कोपरगांव
जेउरकुंभारी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाचे कहार समाजाचे ताराचंद छोटुराम लकारे यांची बिनविरोध निवड झाली. त्याबददल त्यांचा सत्कार करण्यात आला.
