
कोपरगाव प्रतिनिधी:-
धार्मिक भीती व भय निर्माण करून जगात सुरू असलल्या श्रेयवादातून व वर्चस्व वादातून संपूर्ण जग विनाशाच्या उंबरठ्यावर असताना आज जगाला बुद्धाच्या सत्य व शांतीचा संदेशाची गरज आहे असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी व्यक्त केले कोपरगाव येथील लुम्बिनी विहार येथे बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने अभिवादन करण्यात आले
यावेळी बोलताना पोळ पुढे म्हणाले आज आधुनिक काळात सुखाच्या व्याख्या बदलल्या असून धार्मिक गोष्टींची भीती घालून समाजाची दिशाभूल केली जात आहे त्यातून धार्मिक वर्चस्व निर्माण करण्याची ओढ निर्माण झाली असून या चढाओढीत संपूर्ण जग विनाशाच्या खाईत लोटले जात आहे मात्र अडीज हजार वर्षांपूर्वी गौतम बुद्धाने दुःखाचे मूळ कारण तृष्णा असून तृष्णेच्या मागे न लागता सत्य शोधून त्यावर विश्वास ठेवणे आवश्यक असल्याचे तसेच शांती हा सुखाचा मार्ग आहे असे तत्वज्ञान सांगितले होते
आज धार्मिक भीती वर्चस्ववाद यामुळे जग विनाशाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले असून बुद्धांचे सत्य व शांती ही शिकवण जगाला तारु शकते असे म्हटले आहे यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाजीराव रणशूर,शरद खरात व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
