आमदार आशुतोष काळेंच्या हस्ते छत्रपती पुरस्कार मानकरी रमेश गवळींचा सत्कार…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- सामाजिक क्षेत्रात अगेसर राहून नेहमीच समजासाठी उल्लेखनीय योगदान देणारे कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते रमेश पांडुरंग गवळी यांना नुकताच उंबरे येथील छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा छत्रपती पुरस्कार देवून गौरविण्यात आले त्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी नुकताच त्यांचा सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
रमेश गवळी यांनी वैश्विक कोरोना संकटात नागरिकांना मास्क, सॅनिटायझर व अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करून गरीब गरजू नागरिकांना किरणा साहित्य देऊन मदतीचा हात दिला. रमेश गवळी यांनी स्थापन केलेल्या संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी नेहमीच आर्थिक मदत करीत असतात. कोरोना संकटात दिवाळीच्या सणाच्या वेळी नागरिकांना मिठाईचे वाटप व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. त्यांनी आजवर केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन उंबरे येथील छत्रपती प्रतिष्ठानने त्यांना सामाजिक कार्याच्या योगदानाबद्दल ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या हस्ते छत्रपती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी रमेश गवळी यांचा सत्कार करून ते करीत असलेल्या समाजिक कार्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगुले, नगरसेवक मंदार पहाडे, मेहमूद सय्यद, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, फकीरमामू कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.

फोटो ओळ – छत्रपती पुरस्कार प्राप्त रमेश गवळी यांचा सत्कार करतांना आमदार आशुतोष काळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *