कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी मैदानी खेळ अत्यंत आवश्यक असल्यामुळे जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्व आहे. कोपरगाव शहरात देखील अनेक उदयोन्मुख खेळाडू असून या खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास हे खेळाडू निश्चितपणे कोपरगावचे नाव उंचावल्याशिवाय राहणार नाही याचा मला विश्वास आहे. शहरातील खेळाडू व युवकांसाठी क्रीडा संकुल आहे मात्र ते शहरापासून दूर असून त्या ठिकाणी आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे भविष्यात युवा खेळाडूंसाठी अद्यावत क्रीडा उपसंकुल उभारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.
कोपरगाव येथे के.पी.एल. टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक साई संकेत मोबाईल शॉपी संघाने पटकावले. द्वितीय बक्षीस तिरमखे-कानडे फूट वेअर संघ, तृतीय बक्षीस कहार समाज संघ (के.एस.एस. लायन्स) व चतुर्थ बक्षीस माऊली मिसळ हाऊस संघाने मिळवले. मालिकावीर व उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार तिरमखे-कानडे फूट वेअर संघाचा खेळाडू सागर पंडोरे याने पटकाविला तर उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार साई संकेत मोबाईल शॉपी संघाचा खेळाडू आलिम पठाण याला देण्यात आला.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगूले, संदीप कोयटे, नगरसेवक वीरेन बोरावके, मंदार पहाडे, हाजी मेहमूद सय्यद, राजेंद्र वाकचौरे, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार, फकिरमामु कुरेशी, दिनकर खरे, रमेश गवळी, राहुल देवळालीकर, अशोक आव्हाटे, वाल्मिक लहिरे, संदीप कपिले, राजेंद्र जोशी, विष्णू शिंदे, संतोष टोरपे, बाळासाहेब शिंदे, सोमनाथ गायकवाड, गोकुळ वायकर, हिरामण पोटे, संतोष शेजवळ, प्रकाश वायकर, विशाल शिंदे, दादा पोटे, गोविंद वाकचौरे, अलोक तिवारी, हंजला शेख, मानव वगने, दीपक आहेर, सुनील मुळेकर, तुषार विध्वंस, संदीप पाईक, पवन शिंदे सर्व सहभागी संघाचे खेळाडू व क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.

फोटो ओळ – के.पी.एल. टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण करतांना आमदार आशुतोष काळे.
