
कोपरगाव प्रतिनिधी:-
प्रहार जनशक्ती पक्षाचे देवळाली प्रवरा शहर उपाध्यक्ष पदी अबिद शेख व ओंकार मुसमाडे यांची निवड करणेत आली.
प्रहार जनशक्ती पक्षाचे देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष विजय बाळासाहेब कुमावत यांनी आज प्रमाणपत्र देऊन अबिद शाकिर शेख व ओंकार बाबासाहेब मुसमाडे यांची उपाध्यक्ष पदी निवड जाहीर केली.
प्रसंगी प्रहार चे श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस, मिराज शेख, जालिंदर सोनवणे, आंजर शहा आदी उपस्थित होते.
या प्रसंगी शेख व मुसमाडे यांचे अभिनंदन करताना आप्पासाहेब ढुस म्हणाले की, नामदार बच्चूभाऊ कडू यांचे मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष अभिजीतदादा पोटे यांचे सहकार्याने श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्ष वाढीसाठी व ना. बच्चूभाऊ कडू यांचे विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविणेचे आणि प्रहार संघटना वाढीचे काम आम्ही सातत्याने करीत राहणार असून. ज्या युवकांना प्रहार चे कार्य व विचार आवडतात त्यांनी प्रहार मध्ये यावे त्यांचे स्वागत असल्याचे ढुस यांनी सांगितले.
