कोपरगाव शिवसेना आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याला कोपरगावकरांचा जोरदार प्रतिसाद…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शिवसेनेची परंपरा असलेल्या तिथीप्रमाणे शिवजन्मोत्सव सोहळा २०२२ चे उद्घाटन प. पु. रमेशगिरी महाराज यांच्या शुभहस्ते शनिवारी संपन्न झाले. गेल्या ४२ वर्षांपासून कोपरगाव शिवसेनेच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख श्री राजेंद्रजी झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजन्मोत्सव सोहळा पार पडत असून या वर्षीही शिवसेना शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल व अहमदनगर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विशाल झावरे यांच्या नेतृत्वाखाली तीन दिवसीय भव्य देखावा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
तिथीप्रमाणे शिवजयंती २१ मार्च रोजी होती व शिवसेनेच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन दिनांक १९, २० व २१ रोजी करण्यात आले होते परंतु महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याने कोपरगावकरांवर शोककळा पसरली त्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला व गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आयोजित करण्यात आला.
त्यानुसार शनिवार दिनांक ०२ एप्रिल रोजी माजी सैनिक व संगमनेर नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी सुनीलजी गोर्डे साहेब व माननीय श्री कमलाकरजी कोते विधानसभा संघटक तथा अध्यक्ष रामनवमी उत्सव समिती यांच्या प्रमुख उपस्थिती ने कार्यक्रमाची शोभा वाढवली.


सदर उद्घाटनानंतर कमलाकर कोते यांनी मनोगत व्यक्त करताना कोपरगाव शहर शिवसेनेचे कौतुक करून गेल्या ४२ वर्षांपासून चालू असलेल्या कोपरगावातील शिवजन्मोत्सवाचा मी पण एक साक्षीदार असल्याचे आवर्जून सांगितले व या उपक्रमा बद्दल राजेंद्र झावरे यांचे कौतुक केले तसेच सुनीलजी गोर्डे यांनी देखील आपल्या मनोगतात गेल्या दोन वर्षापासून माझ्या कोपरगावातील कार्यकाळात झालेल्या शासकीय शिवजयंतीचे व आजच्या तिथीनुसार साजरा होणाऱ्या शिवजयंती चे तोंडभरून कौतुक केले. सदर कार्यक्रमास कोपरगावकरांनी अलोट गर्दी करुन भरभरुन प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शहरप्रमुख कलविंदरसिंग दडीयाल यांनी केले,सूत्रसंचालन राजश्री पिंगले यांनी केले तर आभार अहमदनगर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विशाल झावरे यांनी मानले.
या वेळी कार्यक्रमास शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष मा.श्री शेखर भाऊ कोलते व उपाध्यक्ष दत्तू पगारे तसेच सर्व समिती सदस्य,संयोजक तसेच शहर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *