के. जे. सोमैया महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन संपन्न…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
“मराठी भाषेला मागील २५०० वर्षांचा इतिहास आहे. त्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या भाषा सल्लागार समितीने अविश्रांत परिश्रम घेऊन पुराव्यासह अहवाल सादर करून ४ वर्षे होऊन गेली. यावर्षी तरी आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळेल अशी आशा जागतिक मराठी भाषा गौरवादिनी होती. महाराष्ट्र शासनानेही त्यासाठी पुनः पुन्हा प्रयत्नही केले. मात्र अद्यापही त्याची घोषणा झाली नाही. यानंतर मराठी माणसाला एकत्र येऊन आपल्या भाषेसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल, त्याशिवाय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होणार नाही.” असे प्रतिपादन कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त श्री. संदीपराव रोहमारे यांनी केले. स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालयामध्ये मराठी भाषा गौरव दिन संपन्न करण्यात आला, त्यावेळी अध्यक्षीय समारोप करताना ते बोलत होते. कार्यक्रमास शिव चरित्रकार श्री. गौरव पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

        श्री. रोहमारे पुढे म्हणाले की, “मराठी माणून भाषिक दृष्ट्या सहनशील आहे. मात्र केंद्र सरकारने त्याच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील.”
        याप्रसंगी प्रमुख पाहुणे शिवचरित्रकारगौरव पवार यांनी आरंभी ज्यांच्या जयंतीनिमित्त हा मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो, त्या वि. वि. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये व थोरवी सांगून नंतर शिवचरित्रातील रोमहर्षक प्रसंग आपल्या ओघवत्या शैलीत कथन केले. त्यामुळे संपूर्ण सभागृहातील श्रोत्यांमध्ये वीरश्रीचा संचार झाला. या कार्यक्रमातच १४ ते २८ जानेवारी याकाळात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त मराठी विभागातर्फे 'स्वातंत्र्यानंतरचा भारत' 'मला भावलेले स्वातंत्र्य सैनिक' भारतीय राज्यघेटनेत झालेले बदल, 'मला आवडलेले देशभक्तीपर गीत' 'राजभाषा मराठी: संरक्षण व संवर्धन' 'अमृत महोत्सवी भारत व आजचा तरूण' 'कोरोना व ठप्प मानवी जीवन' वगैरे विषयावर निबंध, काव्यलेखन, प्रश्नमंजूषा व मराठी म्हणी व बाक्प्रचार स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यांचे निकाल जाहीर करण्यात आले, ते पुढीलप्रमाणे.

१. प्रश्नमंजूषा स्पर्धा : प्रथम क्रमांक पवार निकिता दादासाहेब (द्वितीय वर्ष विज्ञान), द्वितीय क्रमांक लासूरे प्रियंका राजेंद्र (प्रथम वर्ष वाणिज्य), तृतीय क्रमांक- औताडे आदित्य दत्तू (प्रथम वर्ष वाणिज्य).
२. काव्यलेखन स्पर्धा : प्रथम क्रमांक देशमुख आदिती अशोकराव (द्वितीय वर्ष विज्ञान), द्वितीय क्रमांक- पठाण साबिया गफ्फार (द्वितीय वर्ष वाणिज्य), तृतीय क्रमांक- डुबे वृषाली अर्जुन (द्वितीय वर्ष विज्ञान)
३. म्हणी व वाक्प्रचार स्पर्धा: प्रथम क्रमांक मुळे योगेंद्र निलेश (द्वितीय वर्ष विज्ञान), द्वितीय क्रमांक कुलकर्णी धनश्री संतोष (तृतीय वर्ष कला), तृतीय क्रमांक- परजणे स्वाती राजेंद्र (तृतीय वर्ष बी.बी.ए)
४. निबंध स्पर्धा : प्रथम क्रमांक- दिवटे गोरी अजय (द्वितीय वर्ष कला), द्वितीय क्रमांक- मुळे योगेंद्र निलेश (द्वितीय वर्ष विज्ञान), तृतीय क्रमांक- आभाळे पूजा सुनील (प्रथम वर्ष विज्ञान)
वरील पारितोषिक प्राप्त विद्याथ्यांना प्रमुख पाहुणे श्री. गौरव पवार यांच्या शुभहस्ते ग्रंथभेट व सन्मानचिन्ह देऊन मराठी भाषा गोरबंदिनी गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या आरंभी कर्तृत्ववान मराठी माणसे व लेखक यांच्यावर आधारीत चल चित्रफीत दाखविण्यात आली व कु. देशमुख आरती हिने ‘सुवर्ण महोत्सवी भारत’ या विषयावर कविता सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. गणेश देशमुख यांनी केले. तर कार्यक्रमाचा उद्देश प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी आपल्या मनोगतामध्ये स्पष्ट करून महाविद्यालयाच्या विकासाचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ए. एफ. सुर्यवंशी व प्रा. डॉ. एस. के. बनसोडे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन प्रा. व्ही. पी. लंगोटे व प्रा. पी. एल. साळवे यांनी केले होते. कार्यक्रमास सिनेट सदस्य प्रा. डॉ. के. एल. गिरमकर महाविद्यालयातील बहुसंख्या प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *