सडे सोसायटीच्या अध्यक्षपदी कोल्हे गटाचे नारायण लोहकणे तर उपाध्यक्षपदी भरत बारहाते…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
तालुक्यातील सडे सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदीपदी कोल्हे गटाच्या नारायण चांगदेव लोहकणे तर उपाध्यक्षपदी भरत दामू बारहाते यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे. नवनिर्वाचित पदाधिका-यांचे सडे ग्रामस्थांनी विशेष अभिनंदन केले आहे.
या निवड प्रसंगी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन सहाय्यक निबंधक नामदेव ठोंंबळ यांनी काम पाहीले त्यांना आर. एन. रहाणे यांनी सहकार्य केले.
याप्रसंगी कोल्हे गटाचे नवनिर्वाचित सदस्य वाघचौरे मुरलीधर माधव, कोताडे गंगाधर कारभारी,बारहाते बाबासाहेब माधव, धनवटे ज्ञानेश्वर गंगाराम, कोताडे मनकर्णा नानासाहेब, सरपंच अजीत जानकीराम कोताडे, जगन्नाथ वाकचौरे, सतिष बारहाते,दत्तात्रय कोताडे, सुनिल बारहाते,भानुदास लोहकणे,डाॅ. गणेश बारहाते,संजय बारहाते, सुदाम लोहकणे आदी उपस्थीत होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष नारायण लोहकने यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सडे सोसायटीचा कारभार चोखपणे पाहू. अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. शेवटी सचिव नामदेव औताडे, गणेश बारहाते यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *