रविवार दि. 3 एप्रिल रोजी के.जे.सोमैया वरिष्ठ महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
के. जे. सोमैया वरिष्ठ महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा रविवार दिनांक 3 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता महाविद्यालयाच्या साकरबेन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. तरी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या मेळाव्यास उपस्थित राहून मेळावा यशस्वी करावा असे आवाहन के.जे .सोमैया महाविद्यालयाच्या नोंदणीकृत माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष मनीष कोठारी व सचिव नितीन डोंगरे यांनी केले आहे. यावेळी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष बापूसाहेब घेमूड, प्राचार्य डॉ.बी. एस. यादव, मेळाव्याचे समन्वयक डॉ. विलास आवारी, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे व सर्व ज्ञानशाखांचे प्रमुख उपस्थित होते.
या प्रसंगी मनीष कोठारी पुढे म्हणाले की, ” भारतीय संस्कृतीमध्ये ‘कृतज्ञता’ हे एक सर्वोच्च मूल्य मानले जाते. भर दुपारी उन्हात अविश्रांत प्रवास करीत असताना थोडा वेळ का होईना, आपणास विश्रांतीची गरज असते.अशावेळी आपण ज्या झाडाच्या सावली मध्ये विसावलो, त्या झाडाकडे पुढच्या प्रवासास निघाल्यानंतर आपण मागे वळून कृतज्ञतेच्या भावनेने क्षणभर पहावे अशी त्या झाडाची अपेक्षा असते…. तसेच काहिसे स्थान आपल्या जीवनात या महाविद्यालयाचे आहे. त्याचमुळे त्या सह-प्रवासाचा पुनश्च आनंद घ्यावा, महाविद्यालयाचे वर्तमान स्वरूप-विकास बघावा, या सदिच्छेने आपणा सर्वांची पुढील विषयावर एक सहविचार सभा आयोजित केली आहे.”
गरजू विद्यार्थ्यांना नोकरी-व्यवसायासाठी मार्गदर्शन
महाविद्यालयाची सद्यस्थिती व प्रगती
विचारांचे आदान-प्रदान
ऑनलाईन सभासद वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना
मा. अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळच्या विषयांवर चर्चा
महाविद्यालय परिसराची पाहणी व गटचर्चा
या मेळाव्यास जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन को. ता. एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे व सचिव अॅड. संजीव कुलकर्णी यांनी केले आहे.याप्रसंगी माजी विद्यार्थी संघाचे मिलिंद कोते, स्वाती राहाणे, परेश पांडे, विनायक रक्ताटे, अॅड. शरद गव्हाणे, विशाल भारूड, नितीन होन इ. सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *