
कोपरगांव प्रतिनिधी:-
शंकरराव कोल्हे सहकाराचे महामेरू, शैक्षणिक क्षेत्राचे कल्पतरू आणि समाजकारण राजकारणातील महागुरू होते अशा शब्दात कलारंजन नाटय संस्थेचे संस्थापक व कोपरगांव आगाराचे माजी सहाययक आगारप्रमुख भाउसाहेब पोटभरे यांनी श्रध्दांजली वाहिली.
कोपरगांवसह सह राज्यातील हौशी नाटय कलावंताचा संच गोळा करून त्यांच्या प्रत्येक सुख-दुःखात सामिल होवुन अभिनय क्षेत्रात उतरणा-या तरूण तरूणींना ध्येयाचा मार्ग माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी दाखविला. त्यांच्या प्रत्येक समस्या समजावून घेत त्यावर मार्ग काढला. कोपरगांव सारख्या ग्रामिण भागात नाटय चळवळ जीवंत ठेवण्यांचे काम संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी केले त्यामुळे त्यांचे जाणे अभिनय क्षेत्रातील सर्वच कलाकारांना हुरहूर लावणारे आहे असे सांगुन पोटभरे पुढे म्हणाले की, अहमदनगर नाशिक व औरंगाबाद या तीन जिल्हयाच्या सीमेवरील कोपरगांव मतदार संघातील शेतकरी, कष्टकरी व सुशिक्षीत बेरोजगारांच्या हाताला काम देवुन लाखो जणांचे पोशिंदे असलेले शंकरराव कोल्हे यांना परमेश्वराने सर्वापासून हिरावून नेले आहे. त्यांच्या कुटूंबियांशी आपला अत्यंत जवळचा संबंध होता. मनापासून प्रेम देवुन त्यांनी कलारंजन नाटय संस्था व त्यातील सर्व कलाकारांना थेट राज्यस्तरापर्यंत नांवलौकीक मिळवून दिला. गुरू शुक्राचार्यांची संजीवनी त्यांनी आयुष्यभर जपून वाढविली आणि त्यांच्या पुढच्या पिढींने ती नावाप्रमाणे सार्थ ठरविली असे ते शेवटी म्हणाले.
