वृक्षारोपण कचरा आणि जनतेची मानसिकता:- किशोर चोरगे जयहिंद विचार मंच…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कामानिमित्त सदैव तालुकाभर आणि शहरातील सर्वच उपनगरात (प्रभागात) फिरणं होत, काही ठिकाणी मनाला सुखावणारी बाब दिसते तर काही ठिकाणी मनाला खंतीत करणारी
काल परवा असंच महानगरी कोपरगावातील एका प्रभागात जाण झालं भर उन्हात काम चालु होतं तरी मनाला गारवा देणार दृश्य अनुभवायला मिळालं प्रत्येक घरापुढे स्वच्छता आणि घरापुढे एक दोन झाड त्या उपनगरातील (प्रभागातील) त्या गल्लीतील शहरातील इतर भागातील गरम वातावरणा पेक्षा तापमान हे थंड होत तिथल्या लोकांनी वृक्षरूपी जी निसर्गाची संपत्ती जतन केली ती खरंच वाखण्याजोगी होती आणि तिथले लोक ससामन्य पण कचरा हा गोळा करून कचराकुंडीत किंवा गाडीतच टाकतात
नाहीतर महानगरी कोपरगावातील काही ठिकाणी अनेकजण रोज कचरा गाडी येते तरी कचरा झाडाच्या बुडाला टाकुन आग लावतात वृक्षांची निघा न ठेवता वृक्ष व कचरा यांचं एकत्रीकरण करून परिसर गाव वृक्ष मुक्त व कचरायुक्त करतात हि आपल्या भविष्यात चिघळणारी जखम तयार करत आहे
माझ्या मते जर जसं आपण एखाद्या व्यक्तीने (वाटसरूने) पिण्यास पाणी मागितले तर पुण्य समजुन पाणी पाजतो अगदी तसेच, कुठल्या हि भागात कुठ हि एखादं वृक्ष पाण्यावाचुन कोमाजले जात असेन तर नक्कीच शक्य झाल तर त्या वृक्षाला पाणी घालावे वृक्ष वाचवणे हे हि पुण्याचं काम आहे आणि जर शक्य झालं तर आपला कचरा बाहेर फेकुच नाही पण असं होतं नाही कारण आज वृक्षारोपण कचरा आणि जनतेची मानसिकता हि भंगली आहे त्यामुळे
‌वृक्षरोपन मोहिम आणि स्वच्छता अभियानाच मृगजळी कार्य सर्वत्र ठरत आहे
हे कार्य म्हणजे आपल्या गावात लपंडाव खेळण्याचा प्रकार सुरू असल्याच चित्र दिसत असुन सदर मोहिमांना जनतेकडुन क्ष दिला जातो वरतुन टाहो फोडला जातो.कि शहरात स्वच्छता झाली पाहिजे वृक्षारोपण झालं पाहिजे शासनाने हे केलं नाही ते केलं नाही शासन काही करू, जनता म्हणुन आपलं कर्तव्य आपण हि पार पाडलं पाहिजे ते कर्तव्य पार पाडतांना आपण कोणी दिसत नाही म्हणुनच या वृत्तीची किव करावा वाटते जनतेच हे धोरण गावांसाठी घातक आहे
गावात स्वच्छता आणि वृक्षारोपण हि वृत्ती जनतेतुन लांब पळुन गेली आहे
डोळेझाक करून मृगजळामागे धावण्याचा खटाटोप निष्फळ ठरत आहे वृक्षारोपण गावाची स्वच्छता हे प्रत्येकाच्या आत्मीयतेचे बंधन ठरायला हवे पण तसं होत नाही
जनता शासन या कार्याकडे उघड उघड डोळेझाक करत आहे
म्हणुन गावाच नवं चैतन्यमय रूप नवयुवापिढीला पाहता येत नाही
जर नवयुवापिढीला सुजलाम सुफलाम आणि गावाच स्वच्छ सुंदर वृक्षाच्या छायेने नटलेले चैतन्यमय रूप दाखवायचे असेन तर आज करायला काहीच नाही असा विचार योग्य नाही
निसर्ग हा काळ छायेत पहुडलेला आहे त्यास आपण सर्वांनी आता पुढं येत हे कार्य हाती घेत हिरवगार स्वच्छतेचे अलंकृत भविष्य नवयुवा पिढीला त्यांच्या भवितव्याच्या रूपात त्यांच्या करकमलात स्वाधीन केलं पाहिजे
स्वच्छ गाव सुंदर गाव वृक्ष आम्हा सखे सोयरे
हे नुसतं न बोलता प्रत्येक्षात करून दाखवायची गरज आहे वृक्षारोपण कचरा याबद्दल जनतेची मानसिकता बदलली पाहिजे….
जयहिंद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *