सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानचे एकल महिलांसाठी असलेलेऋकार्य कौतुकास्पद:- आमदार आशुतोष दादा काळे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानच्या सौजन्याने रक्षितम ऍग्रोवनिक्स ओपीसी प्राली कंपनी तर्फे एकल महिलांना चवी का चहाचे स्टॉल चे वाटप करण्यात आले. या चविका चहाच्या स्टॉलचे उद्घाटन आमदार आशुतोष दादा काळे यांच्या हस्ते कोर्ट रोड या ठिकाणी झाले.

त्याप्रसंगी बोलताना दादा म्हणाले की सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संगीताताई मालकर या नेहमीच एकल महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाव्या म्हणून नवनवीन उपक्रम राबवत असतात. चहाचा स्टॉल मधून निश्चितच या महिलांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागू शकतो. तहसील कार्यालय पंचायत समिती मार्केट यार्ड व अजूनही काही गर्दीच्या ठिकाणी या महिलांनी स्टॉल टाकावेत. स्टॉल टाकल्यानंतर कोणत्याही प्रकारचा त्रास या महिलांना होणार नाही याची काळजी आम्ही सर्वजण घेऊ. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक विनोद राक्षे सुनील गंगुले, मंदार पहाडे तसेच चवीका चहाचे संचालक मेढे साहेब अमोल घोलप व इतर सर्व कार्यकर्ते एकल महिला भगिनी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *