
कोपरगाव प्रतीनिधी- दक्षिण गंगा म्हणून सर्वांना परिचित असलेल्या पवित्र अशा गोदावरी नदीचा जन्मोत्सव माघ शुद्ध (शुक्ल) प्रतिपदा ते माघ शुद्ध दशमी या दिवशी म्हणजेच सोमवार दि १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या पवित्र अशा गोदावरी नदी किनारी मोठ्या उत्साहात गोदावरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांच्या संकल्पनेतून प्रथमच आई गोदावरी नदीचा जन्मोत्सव साजरा करत गोदावरी मातेची विधिवत पूजा,आरती, साडी चोळी नैवेद्य अर्पण करण्यात आले.यावेळी मोठ्या प्रमाणात गोदामाई सेवकांनी सहभाग घेतला.

गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे सौ.मंगल ढाकणे त्यांचे आई वडील, के जे सोमय्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी एस यादव, श्री व सौ जोशी, श्री व सौ भावसार, विजय सांगळे, सोमनाथ लोहकरे, रवि कथले ,सिध्दार्थ शेळके, प्रशांत घुले, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आकाश नागरे, दिपशेठ, राकेश काले,आतिष शिंदे,रोहन पंडोरे ,प्रदिप निकुंभ, सनी आव्हाड,काशी येथील पंडित, ,निखिल ,शुभम, जनार्धन सुपेकर, प्रज्वल ढाकणे, वैष्णवी ढाकणे, गणेश लोहणेरकर गुरुजी आदी उपस्थित
