
कोपरगांव प्रतिनिधी:-
संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक, महसुल, कृषी, सहकार, परिवहन, कमाल जमीन धारणा, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माजीमंत्री व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे सुत्रधार संचालक, सहकाररत्न, शंकरराव गेनूजी कोल्हे वय ९३ यांचे बुधवारी १६ मार्च रोजी पहाटे साडेचार वाजता नाशिक येथील सुश्रुत हॉस्पीटल येथे वृध्दापकाळाने निधन झाले त्यांच्या मागे पत्नी सिंधुताई, संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष नितीनदादा, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा, स्पेक्ट्रम इर्थस मुंबईचे डॉ. मिलींददादा ही तीन मुले, मुलगी निलीमा वसंतराव पवार, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. भाजपच्या प्रदेश सचिव, तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांचे ते सासरे होते, तर संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टीटयूटचे कार्यकारी विश्वस्थ अमितदादा, सुमितदादा व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेकदादा कोल्हे यांचे ते आजोबा होते. त्यांच्या पार्थीवावर आज बुधवार दिनांक १६ मार्च २०२२ रोजी दुपारी साडेचार वाजता संजीवनी इंजिनियरींग कॉलेजच्या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे तर दुपारी २ ते ४ या वेळेत त्यांचा पार्थीवदेह सहकारमहर्षी कोल्हे कारखाना कार्यस्थळावर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. १९७२ ते १९९३ तर १९९० ते १९९९ या काळात ते महाराष्ट्र विधानसभेचे प्रतिनिधी तर १९९९ ला महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले होते. २०१५ पासुन ते अर्धांगवायूच्या आजाराने आजारी होते परंतु त्यानी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर या आजारावरही मात केली होती.

शंकरराव कोल्हे यांच्या विषयीची व्यक्तिगत माहिती खालील प्रमाणे.
शिक्षण – बी. एस्सी (ऍ़ग्री) पूणे विद्यापीठ 1950, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथे शेती विषयक अभ्यासक्रमाचे 6 महिने प्रशिक्षण. युरोप मध्ये 3 महिने उच्च शिक्षणाचे प्रशिक्षण.
राजकीय प्रवास
1950 -सरपंच, येसगांव ग्रामपंचायत (ता.कोपरगांव) जि. अहमदनगर.
1953-1960 -अध्यक्ष, कोपरगांव तालुका विकास मंडळ (टी.डी.बी) (Taluka Development Board)
1959 – अध्यक्ष, दि. कोपरगांव सहकारी साखर कारखाना लि. गौतमनगर,
पो. कोळपेवाडी, ता. कोपरगांव, जि. अहमदनगर (कोसाका) (आताचा कर्मवीर श्ंकरराव काळे सह.साखर कारखाना लि.)
1962 ते आजपर्यंत- संस्थापक अध्यक्ष, विद्यमान संचालक सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कोपरगांव, (पुर्वीचा संजीवनी सहकारी साखर कारखाना).
दिनांक 29.12.1969 ते 29.12.1971-उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर

कारखाना संघ लि. मुंबई.
दिनांक 29.12.1971 ते 29.04.1975-अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि. मुंबई.
1973 ते 2004 -विद्यमान संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि. मुंबई.
1972 -अध्यक्ष, शेतीमाल प्रक्रिया व विक्री वितरण अभ्यास समिती (कॅबीनेट दर्जा).
1972 ते 1984- व 1990 ते 2004-सदस्य, महाराष्ट्र राज्य विधानसभा, मुंबई (1972-अपक्ष, 1978-काँग्रेस (आय), 1980-काँग्रेस (आय),1990-काँग्रेस (आय), 1995-काँग्रेस (आय),1999-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,)
1975 ते 2020पर्यंत- मॅनेजींग कौन्सील सदस्य,रयत शिक्षण संस्था,सातारा.
1999- हंगामी सभापती, महाराष्ट्र राज्य विधानसभा, मुंबई.
1975-1976- अध्यक्ष, इंडियन शुगर इंडस्ट्रीज इंपोर्ट ऍ़ण्ड एक्सपोर्ट कॉर्पाेरेशन लि. नवी दिल्ली.
1977-1979- खंडकरी शेतकऱ्यांच्या जमीनी मिळविण्यांसाठी आंदोलन त्यात तीन महिने अहमदनगर विसापुर कारागृहात कारावासाची शिक्षा भोगली.
1975 ते आजपर्यंत- संस्थापक संचालक, वसंतदादा शुगर इन्स्टीटयुट मांजरी बुद्रुक, ता. हवेली, जि. पुणे.
1976 ते 2014-संचालक, इंडियन शुगर इंडस्ट्रीज इंपोर्ट ऍ़ण्ड एक्सपोर्ट कॉर्पाेरेशन लि. नवी दिल्ली.
1975-1980- संस्थापक अध्यक्ष, नॅशनल हेवी इंजिनियरींग को. ऑप. लि. पुणे.
1976 -संस्थापक, गोदावरी खोरे सहकारी दुध उत्पादक संघ लि, सहजानंदनगर
कोपरगांव, जि. अहमदनगर.
1981-1988- संस्थापक अध्यक्ष, नॅशनल हेवी इंजिनियरींग को. ऑप. लि. पुणे.
1988 ते आजपर्यंत – संचालक, नॅशनल हेवी इंजिनियरींग को.ऑप. लि. पुणे.
1983-1984 -संस्थापक अध्यक्ष, संजीवनी एज्युकेशन सोसायटी सहजानंदनगर, पो. शिंगणापुर, ता. कोपरगांव.जि. अहमदनगर.
1983-1984- अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य लोकनाटय समिती, मुंबई.
1983-1984- संचाक, अहमदनगर जिल्हा सहकारी बँक लि.
1986 – संस्थापक अध्यक्ष, यशवंत कुक्कूट पालन सहकारी व्यावसायिक संस्था मर्यादित वसंतनगर. (येसगांव) ता. कोपरगांव, जि. अहमदनगर.
1989-1990- अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी मुद्रणालय, पुणे.
1990 -मंत्री, कृषि व फलोत्पादन, सहकार महाराष्ट्र राज्य,मुंबई.
1991- मंत्री, महसुल, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
1992-1993 -मंत्री, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क,कमाल जमीन धारणा, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
1996 -संस्थापक अध्यक्ष, साई संजीवनी सहकारी बँक लि. कोपरगांव, जि. अहमदनगर. (पुर्वीची देवयानी बँक)
1992- संस्थापक, संजीवनी प्रि कॅडेट (सैन्यदल भरती) ट्रेनिंग सेंटर, सहजानंदनगर, पो. शिंगणापुर, ता. कोपरगांव जि. अहमदनगर.
2006 ते 18.12.2012-व्हा. चेअरमन, नॅशनल फेडरेशन को. ऑप. शुगर फॅक्टरीज्, नविदिल्ली.
19.12.2012 -2014 -संचालक, नॅशनल फेडरेशन, नविदिल्ली.
2000 ते 2004-सदस्य, महाराष्ट्र राज्य विधानसभा नियम समिती सदस्य, महाराष्ट्र राज्य सार्वजनिक उपक्रम समिती, मुंबई.
2000 -संस्थापक अध्यक्ष, इंटरनॅशनल फोरम फॉर इंडियन ऍ़ग्रीकल्चर, कोपरगांव (शिंगणापुर) जि. अहमदनगर. (गॅट कराराचा अभ्यास करण्यांसाठी स्थापन केलेली समिती)
2001 -सदस्य, महाराष्ट्र शासन जागतिक व्यापार आंतरराष्ट्रीय शेती करार कार्यकारी कृती गट, मुंबई.
2001-2004 -सदस्य, महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विनियमन सुधारणा विधेयक संयुक्त समिती, मुंबई.
2002-2004- अध्यक्ष, ऊर्जा, उद्योग, रोजगार हमी स्थायी समिती महाराष्ट्र विधानसभा, मुंबई.
2003 -सदस्य, शासकीय व अशासकीय विधेयक समिती, महाराष्ट्र विधानसभा, मुंबई.
2003-2004- सदस्य, सार्वजनिक उपक्रम समिती महाराष्ट्र विधानसभा, मुंबई.
2003-2004 -सदस्य, वीजमंडळ एक्सपर्ट कमिटी,महाराष्ट्र विधानसभा मुंबई.
2003 -सचिव, गोदावरी कालवे, नांदुरमध्यमेश्वर जलद कालवा पाटपाणी संघर्ष समिती, कोपरगांव.
2004-2012 -ऊपाध्यक्ष, श्री. साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी, ता. राहाता जि. अहमदनगर.
2007-2010 -सदस्य, भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नविदिल्ली.
09.05.2017 ते 27.06.2020 पर्यंत -उपाध्यक्ष, रयत शिक्षण संस्था सातारा.
इतर विशेष
- उर्ध्व गोदावरी खो-यात गोदावरी कालव्यांना शेतीसाठी कमी पडणांऱ्या पाण्यांच्या निर्मीतीसाठी मुकणे, मुकणे उंचीवाढ, आळंदी, कडवा, वालदेवी, काश्यपी, गौतमी-गोदावरी, भाम, भावली, वाकी ही धरणांची कामे हाती घेवुन त्याच्या पुर्णत्वासाठी शासनस्तरावर वारंवार पाठपुरावा करून 500 कोटी रूपयांचा आर्थीक निधी मिळवुन 15 टी. एम. सी पाण्यांची नवनिर्मीती. तसेच पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पुर्वेकडे वळविण्यांसाठी शासनस्तरावर 1968 पासुन लढा., सन 2000 मध्ये विधीमंडळात त्यास मान्यता., तर नाशिक शहरवासियांना पिण्यांच्या पाण्यांसाठी नव्यांने किकवी धरण प्रस्तावीत करून त्याकामी पाठपुरावा केला.
- इंटरनॅशनल फोरम फॉर इंडियन ऍ़ग्रीकल्चर या संस्थेच्या माध्यमांतुन भारतीय शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय शेती व्यापार (गॅट) करारात संरक्षण मिळावे म्हणुन 2003 मध्ये मेक्सीकोतील कॅनकुन येथे पार पडलेल्या जागतिक व्यापार संघटनेच्या (World Trade Organisation) पाचव्या बैठकीत प्रतिनिधींचा सहभाग व सादरीकरण.
- राज्यातील शेतक-यांचे फळे, भाजीपाला, फलोत्पादन वाढ व निर्यातीसाठी सन 1989 मध्ये कोल्हे समितीचा अहवाल महाराष्ट्र शासनांकडे सादर त्यातील महत्वपुर्ण बाबींवर सन 2009 पासून अंमलबजावणी सुरू.
- कोपरगांव शहर व तालुक्यातील गोर-गरीब रूग्णांना वैद्यकिय सेवेसाठी 6 कोटी 50 लाख रूपये खर्च करून 50 खाटांचे अद्यावत सुसज्ज ग्रामिण रूग्णालयाची निर्मीती.
- एक कोटी रूपये खर्चाचे कोपरगांव तालुका क्रिडा संकुल.
- कोपरगांव तालुक्यातील शेती व पिण्याचे पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी संजीवनी जलसंवर्धन मोहिमेअंतर्गत सुमारे 8 कोटी 42 लाख 95 हजार रूपये खर्च करून हिंगणी, मंजूर व सडे असे तीन कोल्हापुर पध्दतीचे बंधारे, 44 दगडी साठवण बंधारे, 27 मातीचे बंधाऱ्यांची निमिर्ती व दुरूस्ती, त्यापासुन शाश्वत 2 टी. एम. सी. पाणी साठा वाढवुन लाभक्षेत्रातील शेतक-यांना 5 हजार हेक्टर्स शेती सिंचनासाठी लाभ.
- गोदावरी नदीवर राज्यात सर्वप्रथम हिंगणी येथे 65 लाख 66 हजार रूपये खर्च करून 20.10.1988 रोजी हिंगणी कोल्हापुर पध्दतीचा बंधारा बांधुन त्याद्वारे पाणी अडवुन हिंगणी, मुर्शतपुर, धारणगांव, कुंभारी व सोनारी गावातील 725 हेक्टर जमीन ओलिताखाली आणली.
- 1995 मध्ये गोदावरी नदीवर मंजूर येथे 1 कोटी 59 लाख रूपये खर्च करून कोल्हापुर पध्दतीचा बंधारा बांधुन त्याद्वारे पाणी अडवुन मंजुर, चासनळी, धामोरी, मोरवीस व मायगांवदेवी शिवारातील 826 हेक्टर जमीन ओलिताखाली आणली.
- 1996 मध्ये गोदावरी नदीवर (संजीवनी 40 टक्के, कोसाका 40 टक्के व गणेश 20 टक्के संयुक्त) सडे येथे 3 कोटी 20 लाख रूपये खर्च करून कोल्हापुर पध्दतीचा बंधारा बांधुन त्याद्वारे पाणी अडवुन सडे, संवत्सर, कोकमठाण, सावळीविहीर, कोपरगाव भागातील 1865 हेक्टर जमीन ओलिताखाली आणली. याशिवाय संजीवनी कारखान्यांचे कार्यक्षेत्रात असंख्य पाझर तलाव, दगडी साठवण बंधारे, गांवतळे, शेततळी बांधुन पाणी अडवा पाणी जिरवा उपक्रम हाती घेवुन पुर्ण.
- दिनांक 12.06.1974-कोपरगांव येथे पिपल्स् बँकेशेजारील मैदानावर महाराष्ट्रातील गड कोट किल्ल्यांची माहिती छायाचित्र प्रदर्शन भरविले ते महिनाभर चालले. या प्रदर्शनांस महाराष्ट्र राज्यातील 4 लाख इतिहास प्रेमींनी त्यावेळी भेट दिली होती.
- सन 1974.75-जिनीव्हा येथे महाराष्ट्र राज्य साखर निर्यात महामंडळाचा अध्यक्ष म्हणुन उपस्थिती याप्रसंगी झालेल्या करारात भारत देशाला साखर निर्यातीतुन 450 कोटी रूपये मिळवुन दिले.
- दिनांक 1-05-1979 ते 30.05.1979-कोपरगांव तालुक्यातील जवळके येथे
परिसरातील 15 ते 20 गावातील कुपोषीत मुलां मुलींसाठी लापशी बनवुन ती वाटपाचा कार्यक्रम केला. याप्रसंगी शिक्षण खात्याचे सचिव श्री. कांबळे यांनी भेट देवुन त्याची पाहणी केली. 1200 पोती गहु जमा केला 10 डबे तुपाचे जमा केले होते. - सन 1980-भारतीय रिझर्व्ह बँक मुंबई येथे शेतक-यांच्या कर्जाला व्याजाचा दर कमी व्हावा या मागणीसाठी रूम्हणं मोर्चा नेला. त्यातुन देशभरातील शेतक-यांच्या एकुण कर्जावर अर्धा टक्का व्याज दर कमी झाले.
- स्थापन केलेल्या शिक्षण संस्था- संजिवनी इंग्लिश मिडीयम स्कुल सहजानंदनगर (1978), संजीवनी एज्युकेशन सोसायटी सहजानंदनगर (1982), के. बी. पी. पॉलेटेक्नीक कॉलेज सहजानंदनगर (1982), संजीवनी इंजिनियरींग कॉलेज सहजानंदनगर (1983), संजीवनी प्रि कॅडेट ट्रेनिंग सेंटर व संजीवनी मोटार ड्रायव्हींग स्कुल सहजानंदनगर (15.9.1992), एकलव्य आदिवासी आश्रमशाळा टाकळी (2000), संजीवनी सैनिकी स्कुल सहजानंदनगर (2000), कॉलेज ऑफ फार्मास्क्युटीकल एज्युकेशन अँड रिसर्च सहजानंदनगर (बी.फार्मसी-2003), संजीवनी इन्स्टीटयुट ऑफ फार्मसी अँड रिसर्च सहजानंदनगर (2003) साईबाबा कॉलेज ऑफ एज्युकेशन सहजानंदनगर (बी.एड. आणि डी. एड. कॉलेज-2004), संजीवनी इंटरनॅशनल स्कुल खारघर मुंबई (2005), संजीवनी आर्टस, कॉमर्स, सायन्स सिनीयर कॉलेज सहजानंदनगर (2012), संजीवनी अकॅडमी सहजानंदनगर (सी.बी.एस्सी पॅटर्न 2012), मास्टर ऑफ बिझनेस ऍ़डमिनीस्ट्रेशन स्कुल सहजानंदनगर (एम.बी.ए-2013), संजीवनी ज्युनियर कॉलेज सहजानंदनगर (2014), संजीवनी आर्टस, कॉमर्स, सायन्स ज्युनियर कॉलेज वैजापुर (2017).
पुरस्कार
- आर्यभूषण :- महाराष्ट्र सहकारी मुद्रणालय, पुणे या संस्थेचे संस्थापक स्व.नरूभाऊ लिमये यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सहकार, कृषी, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणां-या व्यक्तीला दरवर्षी दिला जाणांरा आर्यभूषण पुरस्कार 6 जुन 2003 रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मा. ना. सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते मिळाला.
- सहकार रत्न :- सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रीय स्तरावरील इंडियन फार्मर्स फटिर्लायझर को-ऑप.लि., नवी दिल्ली (इफको) या संस्थेच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर दरवर्षी दिला जाणांरा सहकार रत्न पुरस्कार आंतरराष्ट्रीय तांत्रिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रा. हल्दर टॉप्से व इफको संस्थेचे अध्यक्ष मा. बलराम जाखड यांच्या हस्ते 14 नोव्हेंबर 2006 रोजी मिळाला. पुरस्काराचे स्वरूप एक लाख रूपये रोख व स्मृतीचिन्ह.
- जीवन गौरव : – पुणे विद्यापीठ यांच्यावतींने दरवर्षी दिला जाणांरा जीवन गौरव पुरस्कार मिशीगन विद्यापिठ (अमेरिका) सुविख्यात प्राध्यापक सी.के.प्रहलाद यांच्या शुभहस्ते व कुलगुरू डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली 10 फेब्रुवारी 2007 रोजी प्रदान.
- गिरणा गौरव पुरस्कार :- नाशिक येथील गिरणादुत संस्थेतर्फे 5 एप्रिल 2007 रोजी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते गिरणा गौरव पुरस्कार प्रदान.
- आदर्श रयत सेवक पुरस्कार :- रयत शिक्षण संस्था सातारा मानद सचिव पै. ईस्माइल मुल्ला यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदर्श रयत सेवक पुरस्कार चेअरमन ऍ़ङ रावसाहेब शिंदे यांच्या हस्ते 17 डिसेंबर 2012 रोजी सातारा येथे प्रदान.
- शिवाजीराव नागवडे राज्यस्तरीय आदर्श सहकार पुरस्कार :- अहमदनगर जिल्हयातील श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्यांचे संस्थापक, माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्या तर्फे आदर्श सहकार पुरस्कार सरकारी वकील उज्वलराव निकम (मुंबई) यांच्या हस्ते 19 जानेवारी 2013 रोजी प्रदान. पुरस्काराचे स्वरूप रोख 51 हजार, मानपत्र, शाल श्रीफळ
- सत्याग्रही शेतकरी : आत्मचिंतन पुस्तकास क-हेचे पाणी आचार्य अत्रे पुरस्कार-माजीमंत्री शंकरराव कोल्हे साहेब यांनी लिहीलेल्या सत्याग्रही शेतकरी पुस्तकास क-हेचे पाणी आचार्य अत्रे पुरस्कार (मानचिन्ह व रोख रूपये -एक हजार रूपये) सौजन्य-आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठान,पुणे,हस्ते-निवृत्त न्यायमुर्ती – मा. श्री बाळासाहेब रेणके साो. अध्यक्ष- राष्ट्रीय भटक्या विमुक्त जाती आयोग. वितरण समारंभ मंगळवार दिनांक 13.08.2013 रोजी मिळाला.
- जीवन गौरव पुरस्कार :
साखर उद्योगाचा विकास अमुलाग्र पध्दतींने करून त्याचे सक्षम नेतृत्व केल्याबद्दल देशपातळीवर कार्यरत असणांज्या शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन (नविदिल्ली) या संस्थेने माजीमंत्री शंकररावजी कोल्हे साहेब यांना जीवन गौरव पुरस्कार देवुन नुकतेच लखनौ येथे 26 सप्टेंबर 2013 रोजी उत्तरप्रदेशचे कृषि व शिक्षणमंत्री मा. ना. कुंवर आनंद सिंग, तंत्रज्ञान मंत्री मा. ना. अभिषेक मिश्रा, व होमगार्ड मंत्री मा. ना. ब्रम्हाशंकर त्रिपाठी यांच्या हस्ते सन्मानीत केले आहे. - जीवन गौरव पुरस्कार :
साखर उद्योगात उल्लेखनीय योगदान दिल्याबददल डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशनच्यावतींने (पुणे) देण्यांत येणारा जीवन गौरव पुरस्कार माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांना रविवार दिनांक 3 ऑगस्ट 2014 रोजी सुरत येथे गुजराथ राज्याच्या मुख्यमंत्री श्रीमती. आनंदीबेन पटेल यांच्या हस्ते तसेच अर्थमंत्री ना. सौरभभाई पटेल (गुजराथ), वने व पर्यावरण मंत्री ना. गणपतभाई वसावा (गुजराथ) प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यांत आला. - जीवन गौरव पुरस्कार :
कोपरगांव तालुक्यातच उद्योग व्यवसायद्वारे हजारो नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देवुन बाजारपेठ फुलविणारे असामान्य कर्तृत्ववान विभुती म्हणून माजीमंत्री शंकररावजी कोल्हे यांना कोपरगांव तालुका व्यापारी महासंघाच्यावतींने केंद्रीय लघु उद्योग राज्यमंत्री नामदार गिरीराज सिंह, महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री नामदार सुभाष देसाई यांच्याहस्ते शनिवार दिनांक 7 मे 2016 रोजी जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या उपस्थितीत कोपरगांव येथे प्रदान करण्यात आला. - आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार :
सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यात 20 वर्षापेक्षा अधिक योगदान दिल्याबददल किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना भुईज (वाई) यांच्यावतींने देण्यांत येणारा आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार बिहारचे माजी राज्यपाल व शिक्षणतज्ञ डॉ. डी. वाय. पाटील यांच्या हस्ते 14 ऑगस्ट 2017 रोजी प्रदान करण्यांत आला. पुरस्काराचे स्वरूप 1 लाख रूपये रोख व सन्मानपत्र. - मराठा सन्मान पुरस्कार :-
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. नामदार देवेंद्र फडणवीस साो. यांच्या हस्ते अखिल मराठा फेडरेशन व मराठा बिझनेसमेन फोरम यांच्यावतींने देण्यांत येणारा मराठा सन्मान पुरस्कार प्रदान 11.02.2018
27.राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार : कोपरगांव तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने देण्यांत येणारा सन २०२०.२१ चा राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सरालाबेटाचे मठाधिपती महंत प पू. रामगिरी महाराज व राष्ट्रसंत मौनगिरी जनार्दन स्वामी महाराजांचे शिस्त प पू. रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते प्रदान ७.११.२०२१
परदेश दौरा-सहकार, शेती, साखर कारखानदारी, जैवतंत्रज्ञान व इतर विविध विषयांचा अभ्यास करण्यासाठी फ्रान्स, डेन्मार्क, जपान, ऑस्ट्रेलिया, स्वीत्झर्लंड, ब्राझील, आफ्रिका, अमेरिका, फ्रॅकफर्ट, लंडन, साऊपावलो, माटोव्हा, मियामी, वॉशिंग्टन, सॅनदिएगो, रॅले, शिकागो,लॉस एंजल्स, होनलुलु, टोकियो, सिंगापुर, थायलंड, बँकाँक आदि देशांचा सतरा वेळा परदेश दौरा.
छंद-वाचन, पोहणे, घोडेस्वारी.
पुस्तके-महाराष्ट्र : विकासाचे नवे प्रवाह-11 सप्टेंबर 1991,
आंतरराष्ट्रीय शेती करार पुस्तिका-1 मार्च 2001ंः
सत्याग्रही शेतकरी :-आत्मचिंतन 23 जुलै 2012
माजीमंत्री शंकररावजी कोल्हे यांनी सहकाराच्या माध्यमांतुन स्थापन केलेले केमिकल प्रकल्प
ऑक्झॅलिक ऍ़सिड (26.11.1980), डायईथाईल ऑक्झॅलेट (26.03.1981),
ऍ़सिटीक ऍ़सिड (29.12.1983 व 15.11.1992), ईथाइल ऍ़सिटेट (01.01.1985),
इथॅनॉल (जुना 01.10.2003) इथॅनॉल (नवा-1.12.2015) केन ज्युस टु इथेनॉल (2018.19)
बायोगॅस (10.02.1992) बायोगॅस सहवीज निर्मीती 2 मे. वॅट. (01.03.2009)
सहवीज निर्मीती 15 मे.वॅट.(01.01.2011)
ऍ़सिटीक अनहैड्राईड (25.03.1993), क्रोटोनिकाअल्लीहाईड (30.05.2004)
या उपपदार्थ निर्मीतीचा राज्यात पथदर्शी प्रकल्प साकारात
तो यशस्वी केला त्याचबरोबर संजीवनीने
औषधी उत्पादनांतही सल्फोमेथॉक्झॉल (10.10.1990),
ट्रायमिथोप्रिम (01.09.1991), एएससी (22.11.1996),
नॉरफलॉक्सीन (31.12.1996)
आणि आयबुप्रोफेन (2010)
पॅरासिटामॉल (2020)
दिनांक 07.08.2006 ते 09.08.2006-कोपरगांव महापुर याकाळात पुरग्रस्तांना सुरक्षीत स्थळी हलवुन त्यांना संजीवनी उद्योग समुहाच्या माध्यमांतुन दोन वेळचे जेवण चहापान व्यवस्था व मोफत औषधोपचार व धान्यांचे वाटप.
स्थापन केलेल्या सहकारी संस्था
शेतकरी सहकारी संघ मर्यादित, कोपरगांव (१९५३) पुर्वीची कोपरगांव तालुका विकास मंडळ (टीडीबी)
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना लि, सहजानंदनगर (१९६०) वसंतदादा शुगर इन्स्टीटयुट, पुणे (१९७५) नॅशनल हेवी इंजिनियरींग लि, पुणे (१९७५) संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुल, खिर्डीगणेश (१९७८) महाराष्ट्र सहकारी मुद्रणालय, पुणे (१९८९) अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट लि, शिंगणापुर (०३.१२.१९७५) सुवर्णसंजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट लि, शिंगणापुर (२०.१०.१९७६) गोदावरी खोरे सहकारी दुध उत्पादक संघ लि, सहजानंदनगर (१९७६) संजीवनी शैक्षणिक कृषी आणि ग्रामिण विकास विश्वस्थ संस्था, सहजानंदनगर (२६.०७.१९७६) कोपरगांव औद्योगिक सहकारी वसाहत, कोपरगांव (१९७५)
संजीवनी एज्युकेशन सोसायटी, सहजानंदनगर (१९८२) | यशवंत कुक्कुट सहकारी पालन व्यावसायिक संस्था लि. येसगांव (१९८६)
संजीवनी प्रि कॅडेट ट्रेनिंग सेंटर व संजीवनी मोटार ड्रायव्हींग स्कुल, सहजानंदनगर (१५.०९.१९९२) संजीवनी सहकारी पतसंस्था मर्यादित, कोपरगांव (१५.०६.१९८४) साई संजीवनी सहकारी बँक लि, कोपरगांव (१९९६) संजीवनी मत्स्य विकास सहकारी संस्था लि. शिंगणापुर (१९९६) | एकलव्य आदिवासी आश्रमशाळा, टाकळी (२०००)
दिनांक 29.07.2000 जागतिक व्यापार संघटनेच्या पटलावर भारतातील शेतकरीज्यांना संरक्षण मिळावे, येथील शेती व्यवसाय टिकावा यासाठी कोपरगांव येथे इंटर नॅशनल फोरम
फॉर इंडियन ऍ़ग्रीकल्चर संस्थेची स्थापना करून त्या माध्यमांतुन तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री नितीश कुमार यांच्यापुढे निवेदन सादर करून येथील शेतीला व शेतमालाला संरक्षण मागितले तसेच कॅनकुन येथील जागतिक व्यापार संघटनेच्या परिषदेच्या बैठकीस इंटर नॅशनल फोरम फॉर इंडियन ऍ़ग्रीकल्चर संस्थेचे प्रतिनिधी पाठवुन भारतातील शेतकज्यांना व त्यांच्या शेतमालास संरक्षण मिळविण्यासाठी जागतिक पटलावर काम केले, निवेदन दिले.
दिनांक 23.06.1964 कोपरगांव येथील सदगुरू गंगागिर महाराज महाविद्यालय (एस एस जी एम कॉलेजला) आर्टस, कॉमर्स आणि सायन्स अभ्यासक्रमासाठी परवानगी मिळविली.
