समाजाला न्याय देण्यात माध्यमांचे कार्य महत्त्वाचे :- तहसिलदार योगेश चंद्रे…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:- समाजातील सर्व घटकांना न्याय देतांना प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची असून लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी पत्रकारांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन तहसिलदार तथा घटना व्यवस्थापक योगेश चंद्रे यांनी व्यक्त केले.
तहसिल कार्यालय कोपरगाव व कोरोना नियंत्रण समितीच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करून पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते.या निमित्ताने कोरोना संसर्ग निर्मुलन अभियानात विविध माध्यमांचे प्रतिनिधी यांचा विशेष प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.


कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तहसिलदार तथा घटना व्यवस्थापक योगेश चंद्रे होते.याप्रसंगी वैद्यकीय अधिक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर, विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली बडदे (आव्हाड), पत्रकार नानासाहेब जवरे, डॉ.अरुण गव्हाणे, राजेंद्र सालकर, मनिष जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.दरम्यान दिवंगत पत्रकार अशोक खांबेकर, पांडुरंग रायकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
तहसिल कार्यालयाने पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचे विशेष गौरवाबद्दल पत्रकारांनी समाधान व्यक्त करुन आभार मानले.
या प्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी प्रास्तविक यांनी तर सुत्रसंचलन समन्वयक सुशांत घोडके यांनी केले.तर आभार विजय कापसे यांनी मानले.कार्यक्रमास कोपरगाव प्रेस क्लब, कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, कोपरगाव तालुका तसेच विविध वृत्तपत्रे यांचे प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचे प्रतिनिधी, छायाचित्रकार यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *