सामाजिक न्याय विभागाकडून ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी पुन्हा १ कोटी निधी:- ना. आशुतोष काळे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागातील रस्ते विकासाचा मोठा अनुशेष होता. हा अनुशेष भरून काढण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून दोनच वर्षात मोठ्या प्रमाणावर निधी आणला आहे. रस्ते विकासासाठी शासनाच्या ज्या विभागाकडून निधी मिळणे शक्य आहे त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. त्या पाठपुराव्यातून दोन महिन्यापूर्वी कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून १ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून पुन्हा एकदा १ कोटी रुपये निधी मिळाला असल्याचे श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.
रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील विविध रस्त्यांसाठी निधी मिळावा यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे प्रस्ताव दाखल केले होते. त्या प्रस्तावाची सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दखल घेवून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत पुन्हा १ कोटी रुपये निधी दिला आहे. यामध्ये कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथील दिलीप रोकडे घर ते घोयेगाव चौफुली, सडे येथील सूर्यभान बारहाते घर ते मोहन देठे घर, कोकमठाण येथील गोसावी वस्ती ते सुरेश धिवर वस्ती, संवत्सर (लक्ष्मणवाडी) रगडे वस्ती ते कासली रस्ता, भोजडे येथील अर्जुन घनघाव घर ते विजय घनघाव घर वस्ती, सावळगाव येथील कासली अंदरसुल रस्ता ते प्रकाश साळवे घर रस्ता, पढेगाव येथील पढेगाव अंदरसूल रोड राजेंद्र बर्डे घर ते पढेगाव गाव रस्ता, धामोरी येथील (प्रजीमा ४) कारभारी फकीरा माळी घर ते केरळवाडी मायगाव देवी शिव रस्ता, मळेगाव थडी येथील सोपान मोरे घर ते ज्ञानदेव शंकर दवंगे वस्ती, मळेगाव येथील कैलास दवंगे घर ते वाळीबा कारभारी माळी घर या रस्त्यांच्या खडीकरणासाठी प्रत्येकी १० लाख याप्रमाणे १ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
त्याबद्दल मतदार संघातील जनतेच्या वतीने ना. आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री ना.अजितदादा पवार, पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री ना. धनंजय मुंडे, सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. विश्वजित कदम यांचे ना. आशुतोष काळे यांनी आभार मानले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *