सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना शाश्वत व दिशादर्शक संस्था उत्तरप्रदेश सरकारने लखनौ येथे केला गौरव…

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:-
महाराष्ट्रातील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना शाश्वत व दिशादर्शक संस्था आहे असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय भुस रेड्डी यांनी केले.
लखनौ (उत्तरप्रदेश) येथे शुगर फेडरेशनचे कार्यकारी संचालक आर. के. पांडे (आयएएस) आणि शुगर फेडरेशनचे टीम लिडर सुनिल ओहरी यांनी सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रीत केले होते, त्यात ते बोलत होते. या परिसंवादास देशभरातील पाच अग्रगण्य साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींना आमंत्रण देण्यात आले होते.
श्री. बिपीनदादा कोल्हे या परिसंवादात बोलतांना म्हणाले की, केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या सहकार्यातून सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याने पॅरासिटामॉल औषधी प्रकल्प हाती घेतला आहे; माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक दिशादर्शक पायलट प्रकल्पांची अंमलबजावणी केली असून ती राज्याला आदर्शवत ठरली आहे. कोल्हे कारखान्यात ज्युस टु इथेनॉल, सहवीज निर्मिती, डिस्टीलरी, कंट्रीलिकर, कच्ची- पक्की साखर, रासायनीक उपपदार्थांची निर्मीती, बायोगॅस, दैनंदिन गाळप क्षमतेत आधुनिक तंत्रज्ञानासह संगणकाचा प्रभावी सक्षमपणे वापर इत्यादी विविध उपक्रमांची माहिती बिपीनदादा कोल्हे यांनी दिली.
उत्तर प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय भुस रेडडी यांनी या परिसंवादात कोवीड १९ जागतिक महामारीच्या काळात महिलांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रमाअंतर्गत महिला बचतगट, महिला सक्षमीकरण व विकासाचा महत्वाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. याप्रसंगी डी. एस. सी. शुगरचे अध्यक्ष रोशन टमक, जुभारी अॅग्रो शुगर डिव्हीजनचे अध्यक्ष आलोक सक्सेना उपस्थित होते. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे प्रॉडक्शन हेड विवेककुमार शुक्ला यांनी प्रास्तविक केले. अतिरिक्त मुख्य सचिव संजय भूस रेड्डी यांचा संजीवनी उद्योग समुहाच्या वतीने बिपीनदादा कोल्हे यांनी सत्कार केला.

फोटो ओळी:-
कोपरगाव लखनौ (उत्तरप्रदेश) येथे साखर कारखानदारी बाबत परिसंवाद आयोजित करण्यात आला होता त्यात उत्तरप्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय भुस रेड्डी, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, शुगर फेडरेशनचे कार्यकारी संचालक आर. के. पांडे (आयएएस), शुगर फेडरेशनचे टीम लिडर सुनिल ओहरी, प्रॉडक्शन हेड विवेककुमार शुक्ला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *