समन्यायी पाणी वाटप कायद्यात सुधारणा करावी राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली ना.गडाखांची भेट…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी :- समन्यायी पाणी वाटप कायद्यात सुधारणा करण्यात यावी यासाठी नगर जिल्ह्यात शिवसेनेच्या वतिने जिल्हा प्रमुख राजेंद्र.झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली लढा उभारण्यात येत आहे.समन्यायी पाणी वाटप व्हावे यासाठी मराठवाडा आणि नाशिक नगर असा संघर्ष अनेक वर्षापासून उभा होता.त्यानंतर कायदाही करण्यात आला.कायदा करतांना समन्यायी पाणी वाटप कायद्याला फारसा विरोध झाला नाही. परंतु आता नाशिक नगर जिल्ह्यात पाणी टंचाई संकट उभे राहिले आहे.हे संकट शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या लक्षात आले यासाठी शिवसेनेच्या वतिने हा लढा लढविण्यात येत आहे.भविष्यात हा लढा तिव्र होणार असे दिसून येत आहे , पाणी वाटप कायद्यातील तरतुदी नुसार जायकवाडी धरण ६५ टक्के भरल्याशिवाय गोदावरी कालव्यातून शेतीसाठी पाणी देखील मिळत नाही त्यामुळे नगर व नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होत असून शेतातील उभी पिके अनेकवेळा पाण्यावाचून जळून जातात.त्यामुळे शासनाने या कायद्यात लवकरात लवकर बदल करावा , जायकवाडी धरणावरील मंजूर केलेला अन्यायकारी समन्यायी पाणी वाटप कायद्यात बदल करण्यात यावा . तसेच नगर नाशिक व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नासंदर्भात २००५ साली तत्कालीन सरकारने अन्यायकारक समन्यायी पाणी वाटप अधिनियम कायदा मंजूर केला परंतु या कायद्याप्रमाणे कोणतीही कारवाई झाली नाही म्हणून २०१२ साली शासनाने मंजूर केलेल्या समन्यायी पाणी वाटप कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी मेंढेगिरी समिती स्थापन केली आणि या समितीने तयार केलेल्या अहवालात जायकवाडी धरण ६५% टक्के भरल्याशिवाय गोदावरी कालव्यांना खरिपाचे आवर्तन सोडण्यात येऊ नये ही घातलेली जाचक अट तत्काळ रद्द करण्यात यावी यासाठी नामदार गडाख यांची शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे रावसाहेब खेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली खाली शिवसेनेच्या शिष्टममडळांनी नामदार शंकरराव गडाख यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेवुन निवेदन दिले आहे.यावेळी जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे, रावसाहेब खेवरे. कोपरगाव शिवसेना तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे कोपरगाव शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल,सहसंघटक वैभव गिते,मंगेश देशमुख यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी नामदार शंकरराव गडाख साहेबांशी सविस्तर चर्चा झाली असुन या विषयावर मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे यांच्या कडे चर्चा करु त्यांच्या समोर हा विषय मांडून लवकरच यावर तोडगा काढु असे आश्वासन गडाख साहेबांनी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *