ग्रंथ परीचय,, ‘शुक्र तीर्थ’:- बाळासाहेब आव्हाड…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-(हेमचंद्र भवर)
तालुक्याला ऐतिहासिक पौराणिक धार्मिक साहित्यिक सांस्कृतिक महान परंपरा लाभली आहे आजतागायत अनेक साहित्यिकांनी लेखन परंपरेत मोलाची भर घातली आहे अनेक लेखक कवी साहित्यिकांनी अनेकविध विषयांवर लेखन करून साहित्यिक परंपरा समृद्ध केली आहे


कोपरगाव गंगा गोदावरी काठचा दंडकारण्याचा भाग याच दंडकारण्यात प्रभू रामचंद्र यांचे पासून ते राघोबादादा पेशवे यांच्या पर्यंत पाऊल खुणा सापडतात
कोपरगाव बेट भागातील परमगुरू शुक्राचार्य महाराजांच्या कार्याचा व देवस्थानचा महिमा श्री बाळासाहेब आव्हाड यांनी आपल्या कौशल्याने जनमानसासमोर – शुक्र तीर्थ – या ग्रंथातून मांडला आहे
नव्या पिढीच्या माहिती साठी देवस्थानचा पुरातन महिमा महत्व जाणून भक्तांना दर्शन सुविधा व मनसमाधान होऊन प्रसन्न वातावरण निर्माण केले आहे
अनेक भक्तांना माहीत आहे की – येथे शुभ विवाहासाठी मुहूर्त लागत नाही येथील संजीवनी पाराचे महत्व आणि खूप काही माहिती श्री बाळासाहेब आव्हाड यांनी सदरच्या ग्रंथातून मांडली आहे ग्रंथात संदर्भानुसार रेखाचित्र परीसरातील छायाचित्र केलेल्या बदलांचे छायाचित्रे प्रकाशित केले आहेत
शुक्र तीर्थ हा ग्रंथ वाचनीय संग्राह्य असून प्रत्येकाच्या घरात असावा असाच आहे
परमगुरू शुक्राचार्य महाराजांच्या कार्याचा गौरव म्हणून हा ग्रंथ सिद्ध झाला आहे
लेखकाच्या या महान कार्याला लाख लाख शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *