भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या पूर्णत्वाने सौ स्नेहलता कोल्हे यांचे ध्येयवादी स्वप्न साकारले:- दत्ता काले…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
भाजपा प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या माध्यमातून कोपरगाव शहरातील अनेक लोकोपयोगी वास्तू पूर्णत्वास नेण्यासाठी अथक प्रयत्न झाले व भरघोस निधी आणून या वैभवशाली वास्तू निर्मितीसाठी प्रयत्नशील राहून त्यांनी केलेले कार्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाची अद्ययावत इमारत पूर्ण झाली असून शहरासह तालुक्यातील नागरिकांना या संकल्पपूर्तीचा आनंद असल्याचे प्रतिपादन भाजपा शहराध्यक्ष श्री.दत्ता काले यांनी केले आहे.
आपल्या मतदारसंघातील युवक-युवती यांच्या उज्वल भविष्याच्या दृष्टीने मौल्यवान ठरणारी वाचनालय इमारत पूर्ण झाल्याने स्नेहलता कोल्हे यांनी आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धात्मक युगात देशात नाव उज्वल करण्यासाठी नक्की अधिक सज्ज होईल हे स्वप्न साकार होण्यास या वास्तूमुळे व अद्ययावत सुविधांमुळे साध्य होईल अशी खात्री आहे.
वैशिष्ट्यपूर्ण योजना व महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान(जिल्हास्तर)योजने अंतर्गत रक्कम १ कोटी ३२ लक्ष,४३ हजार ४०३ रुपये एवढा भरीव निधी वाचनालय इमारतीसाठी कोल्हे ताईंनी मिळविला होता.या इमारतीच्या अंतर्गत आसन व्यवस्था,लिप्ट सुविधा,सुसज्ज वातावरण यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आपले स्पर्धा परीक्षेसह अन्य परिक्षांचे अभ्यासाचे स्वप्न साकारले जाणार असून याचा स्नेहलता कोल्हे यांना अतिशय आनंद आहे.
सौ स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव मतदारसंघात विकासाचा आलेख उंचावत कोपरगावच्या वैभवात भर पाडणाऱ्या बसस्थानक,वाचनालय,पोलिस स्टेशन इमारत,पंचायत समिती इमारत व अधिकारी निवासस्थान,नगरपालिका नूतन इमारत,गोकुळनगरी पूल,बाजार ओटे,अशा देखण्या व लोकोपयोगी अद्ययावत वास्तू जनसेवेसाठी उभारल्याने राजकीय गट-तट रहित सर्वांना या कामाचा हेवा वाटतो.अशी विकासकामे ही क्वचितच मतदारसंघात एकत्रित होतात. सौ. कोल्हे यांची दूरदृष्टी ही आपल्या भागातील विद्यार्थी भौतिक सुविधांमुळे मागे पडता कामा नये,आजचे युवक हे उद्याचे देशाचे भविष्य आहेत त्यांना मिळणाऱ्या तुटपुंज्या सुविधा बदलवत तंत्रज्ञानाच्या युगात चांगले बदल करणे माझे स्वप्न असून मतदारसंघाचा कधीही कोणीही नाकारू शकत नाही, असा सर्वमान्य विकास हेच माझे ध्येय समजून सौ. कोल्हे यांच्या कार्याचे व मतदारसंघासाठी मिळवलेल्या निधीचे हे फलित आहे, उद्घाटने तसेच लोकार्पण कधीही झाली व कोणीही केली तरी जनतेच्या हितासाठी जे प्रयत्न या इमारतींच्या मंजुरी व निधीसाठी मी केले त्या वास्तू जनतेच्या सुखासाठी उपयुक्त ठरतील असे सौ. कोल्हे यांनी नेहमी सांगितले आहे.या उदात्त हेतूने काम करणाऱ्या आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून सौ स्नेहलता कोल्हे यांना नागरिकांच्यावतिने आम्ही धन्यवाद देतो असेही शेवटी दत्ता काले म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *