कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- मागील दोन वर्षात सर्व जाती धर्माच्या नागरिकांना समान न्याय देऊन विविध समाजाच्या सभामंडपासाठी निधी दिला आहे. आपल्या कुटुंबातील सदस्य या नात्याने तुमच्या अडचणी सोडविणे माझी जबाबदारी आहे. सर्व समाजाला समान न्याय देऊन सर्व समाजाबरोबर सुवर्णकार समाजाचे देखील प्रश्न सोडविणार असल्याचे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी केले.
संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त ना. आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे संत शिरोमणी श्री नरहरी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी, रमेश गवळी, फकीर कुरेशी, दिनकर खरे, राहुल देवळालीकर, संदीप कपिले, संदीप देवळालीकर, प्रकाश भडकवाडे, विलास नागरे, संतोष देवळालीकर, भाऊसाहेब बागुल, अरुण बागुल, शिवाजी देवकर, कृष्णा उदावंत, राजेंद्र कपोते, मनोज विसपुते, जया बाविस्कर, दिपक विसपुते, चंद्रकांत उदावंत, नंदू जाधव, नंदू विसपुते, संजय जळगावकर, अनिकेत भडकवाडे, योगेश उदावंत, सतीश कपिले, महेश उदावंत, तेजस देवळालीकर, पियुष विसपुते, मुकुंद उदावंत, नवनाथ उदावंत, अशोक दुसाळे, चंद्रशेखर म्हस्के, जावेद शेख, रावसाहेब साठे, प्रकाश दुशिंग, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निखील डांगे, शहराध्यक्ष कार्तिक सरदार, बाळासाहेब रुईकर, धनंजय कहार, गणेश लकारे, विकी जोशी, जनार्दन शिंदे,विलास आव्हाड, मनोज नरोडे, रोहित खडांगळे, निलेश उदावंत, सागर लकारे, राहुल आदमाने, रोहित लकारे, अमोल देवकर, मुकुंद भुतडा, ऋषिकेश खैरनार, संदीप भडकवाडे, अनिल जाधव आदींसह समाजबांधव उपस्थित होते.

फोटो ओळ :- संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करतांना ना. आशुतोष काळे
