कोपरगाव चा मराठी माणूस , श्री. भरतभाऊ मोरे यांची मुबंई च्या मायानगरीत मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रात भरारी…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:- आपल्या कोपरगावातील एक लढवय्या छोटासा मराठी माणूस भरत भाऊ मोरे यांनी मराठी चित्रपट क्षत्रातील नामांकित मोठ्या कलाकारांना घेवून , आपल्या गावातील कलाक्षेत्रातील लोकांना संधी देऊन , त्यांच्या नवीन दुसऱ्या “मास्क”या नावाच्या चित्रपटाची शूटिंग ची सुरवात कोपरगावातच काल केली , त्या बद्धल भरत भाऊ मोरे व त्यांना खंबीर पने साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी शिवसेनेच्या नगरसेविका सौ.सापनाताई मोरे यांचा सत्कार माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केला…
यावेळी मंगेश पाटील म्हणाले की भरत भाऊच्या आयुष्याची सुरवात नगरसेवक , शिवसेनाशहरप्रमुख ते मेडिकल दुकानदार ते चित्रपट निर्माता हे त्यांच्या आयुष्याचा चढता क्रम , कौतुकास्पद आणि कोपरगाव च्या नवतरुणांना प्रेरणादायी होणार आहे…या चित्रपटात भरत भाऊ हे स्वतः लेखक , डायरेक्टर , चित्रपट निर्माते आहेत .ही कोपरगावकारांसाठी मोठी कौतुकाची गोस्ट आहे. ह्या चित्रपटाची शूटिंग ची सुरवात काल, कोपरगाव शहरात केली असून २८ आगस्ट परियन्त मोठं मोठ्या कलाकार , अभिनेते संदीप पाठक , प्रसन्न केतकर , हार्दिक जोशी , शाम श्रीवास्तव , राम कतोरे तसेच अभिनेत्री निशा परुळेकर , राधा सागर , कल्याणी चौधरी सह अनेक अभिनेते कोपरगाव मध्ये या शुटींगसाठी आले आहेत येणार आहे.झी चित्रपट मार्फत हा चित्रपट डिसेंबर मध्ये प्रदर्शित केला जाणार आहे….


या मुळे आपले कोपरगाव हे महाराष्ट्र , भारत भर ,जगात दाखवले जाणार आहे , दिसणार आहे.ही कोपरगाव करांसाठी मोठी अभिमानाची बाब असणार आहे..मोठ्या प्रमाणात शूटिंग आणि कलाकार बघण्यासाठी नागरिक , चित्रपट प्रेमी गर्दी करत आहे.सध्या भरत भाऊ मोरे व त्यांच्या ” मास्क ” चित्रपटाची चरच्या पंच क्रोशीत चालू आहे.या कोरोना च्या कठीण काळात ते हे तरुणांना प्रेरणा देणारे असे काम करत आहे….
तमाम कोपरगाव च्या जनतेच्या वतीने त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *