कोपरगाव काँग्रेसचे युवा शिलेदार पंजाब निडणुकीसाठी काँग्रेसच्या मदतीला…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
महाराष्ट्राचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांचे खंदे समर्थक म्हणून परिचित असणारे जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तुषार पोटे यांची पंजाब राज्यातील निवडणुक कामकाजासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने अमृतसर उत्तर विधानसभा येथे निवड झाली आहे.
येथील स्थानिक उमेदवार श्री.सुनील दत्ती यांच्या निवडणूक प्रचारार्थ ते सध्या अमृतसर येथे दाखल झाले असून त्यांच्या सोबत निरीक्षक तेजस्वी मांजरेकर हे देखील आहेत.घर ते घर प्रचार,समाज माध्यमाद्वारे प्रबोधन व रवीदासी समाजाच्या युवकांच्या गाठीभेटी घेऊन ते काँग्रेसचा प्रचार करीत आहेत. पोटे हे उच्चशिक्षित एम.कॉम,एम.बी.ए असून व्यवस्थापन कौशल्याचा तसेच संघटनात्मक कामाकाजासह निवडणूक यंत्रणा यांचा दांडगा अनुभव आहे.
याचीच दखल घेत युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.व्ही श्रीनिवास, एससी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष व अमृतसर जिल्हा प्रभारी राजेश लिलोठीया,महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी पोटे यांची निवडणूक कामकाजासाठी नियुक्ती केली आहे. त्यांचे कोपरगाव तालुका काँग्रेस,संगमनेर तालुका काँग्रेस सह जिल्ह्यातील काँग्रेस नेते व कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *