आमदार काळे यांचा मतदारसंघातील विकास कामांशी कवडीचाही संबध नाही:- साहेबराव रोहोम…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केलेल्या निधीतून राष्ट्रीय महामार्ग एन एच 752 जी चे १७८ कोटी रुपये खर्चाचे कामाची निविदा प्रसिद्ध झाली असून त्यासाठी भाजपाच्या प्रदेश सचिव सौ.स्नेहलता कोल्हे व संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे यांनी सातत्याने नामदार गडकरी यांचेकडे केलेल्या पाठपुराव्याचे हे फलित आहे,हे सर्वश्रुत असतांना केवळ येऊ नको म्हणे कोणत्या गाडीत बसू अशी गत असलेल्या विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी भाजपाच्या मंत्री महोदयांनी त्यांच्या शब्दाला किंमत दिल्याचा बेगडी कांगावा करणे हे हास्यास्पद आहे, अशी घणाघाती टीका भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी सुधाकर रोहोम यांच्या टिकेला सणसणीत प्रतिउत्तर देतांना केली आहे.
ते म्हणाले की, नगर-मनमाड हा जीवघेणा महामार्ग अशी ख्याती मिळाली असलेला महामार्ग दुरुस्ती करण्यास राज्य सरकार कोणत्याही बाजूने सक्षम नसल्याचे सिद्ध होत होते. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीघाडी सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे, व त्यांची मानसिकता नव्हती. पर्यायाने हा महामार्ग केंद्राकडे वर्ग करून निदान नागरीकांना होणाऱ्या या अथक जाचातून मुक्त करावे अशी विनवणी नितीन गडकरी यांच्याकडे माजी आमदार सौ.कोल्हे यांनी केली होती.त्याच पार्श्वभूमीवर २०२१ ला नामदार गडकरी यांच्या अहमदनगर दौऱ्यामध्ये सकारात्मक प्रतिसाद त्यांनी दिला होता व तशी निधीबद्दल घोषणा देखील केली होती.भाजपा पदाधिकारी यांच्या शब्दाला केंद्रीय मंत्री प्रतिसाद देतात हे अनेकदा सिद्ध झालेले असतांना जे स्वतः राष्ट्रवादीमध्ये आहेत त्यांनी भाजपाच्या मंत्र्यांनी केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी उडी घेणे म्हणजे येऊ नको म्हणे कोणत्या गाडीत बसु अशी गत कोपरगावचे आमदार आशुतोष काळे व त्यांच्या कार्यकर्त्यांची झाली आहे.
आमदार काळे जेव्हा सत्तेत स्थापन झाले तेव्हापासून गेल्या दोन वर्षात तांत्रिक मंजुरी व प्रशासकीय मंजुरी शब्द सोडून कवडीचा निधी स्व कर्तृत्वाने काळे यांनी आणलेला नाही याचा विसर सुधाकर रोहोम यांना पडला असावा त्यामुळेच कोल्हे कुटूंबावर टीका करण्याची त्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे.
कोपरगाव शहरात नगरसेवकांच्या हक्काच्या निधीच्या कामांच आयते नारळ फोडणे, सौ.कोल्हे यांच्या काळातील विकासकामांवर आयत्या कोनशिला लावणे व उद्घाटने करणे अशी बाळबोध धडपड विरोधक करत असून स्वतःच्या निधीतून मंजूर असून पूर्ण केलेले एकही काम काळे यांना आजवर करता आले नाही यातच कोणाचा कशाशी कवडीचाही संबंध नसतो हे वारंवार सिद्ध झाले आहे याबाबत आमदार काळे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करावे.
आमदार काळे यांनी भाजपा सरकारच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीवर हक्क दाखवण्यापेक्षा कोपरगाव मतदारसंघाचा शेजारील नाशिक,औरंगाबाद जिल्हा सिमा जोडणारे रस्ते राज्यसरकार कडून करून घेण्याची गरज आहे, मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे उदाहरणादाखल स्पष्टीकरण द्यायचे झाले तर झगडे फाटा ते तळेगाव हा रस्ता संगमनेर हद्दीत उकृष्ट आहे तर कोपरगाव हद्दीत मात्र रस्ता कुठे आहे शोधत चालावे लागते. कोपरगाव-पुणतांबा-श्रीरामपूर या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. या शिवाय कोपरगाव शहरातील व ग्रामिण भागातील अनेक रस्ते होत्याचे नव्हते झाले आहेत, त्यावर आमदार काळे यांना काहीच करता आले नाही. तेव्हा आमदार काळे यांनी अगोदर त्यासाठी निधी मिळवावा, प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी आणि खुशाल त्याचे श्रेय लाटावे याउलट दुसऱ्यांच्या आयत्या कामांचे श्रेय घेण्यासाठी धडपड करू नये. केवळ सवंग लोकप्रियतेसाठी दुसऱ्यांच्या कामाबाबत नाक खुपसू नये, प्रत्यक्षात काम मंजूर करून त्यासाठी निधी मिळवा मात्र तसे न करता एकाच निधीचे पन्नास तुकडे करून दीडशे वेळा जाहिरातबाजी करून घेत जनतेला फसवण्याचा विचार आमदार काळे करत होते, मात्र त्यांची ही चाल जनतेने ओळखली असून त्याचे उत्तर जनताच त्यांना योग्य वेळी देईल.
कोपरगाव मतदारसंघाच्या विकासाशी आमदार काळे यांचा कवडीचाही संबंध नाही. त्यांचा संबंध फक्त जनतेच्या होणाऱ्या हाल अपेष्टा व गैरसोयीशी आहे, वाढीव विजबिले, वीज रोहित्रiचा वीज पुरवठा खंडित करून शेतकऱ्यांचे हाल करणे, गोरगरीब उपेक्षित जनतेच्या निगडित कामासाठी त्यांना हेलपाटे मारायला लावणे, ग्रामीण भागातील रस्ते अक्षरशः खड्डेमय झाले आहे त्याचे श्रेय काळे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेण्यासाठीही पुढे यावे, केवळ फ्लेक्सबाजी करण्यापेक्षा प्रत्यक्षात विकासकामे देखील नजरेत भरली पाहिजे अशी मिश्कील टिप्पणी साहेबराव रोहोम यांनी शेवटी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *