कोपरगावच्या लेखणीचा नाशिक जिल्ह्यातही डंका..!!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यातील देर्डे कोर्हाळे येथील मुळ रहिवासी व सध्या नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे कन्हैया माऊली वारकरी शिक्षण संस्थेच्या निमित्ताने स्थानिक झालेले ह.भ.प राजेंद्र थोरात यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या नाशिक जिल्हाध्यक्ष पदी निवड झाली या निमित्ताने कोपरगाव तालुक्यातील या सुपुत्राच्या लेखणीचा डंका नाशिक जिल्ह्यातही असल्याचे या निमित्ताने कळले आहे.अखिल भारतीय वारकरी मंडळ तसेच सार्वमत आणि गावकरी या वर्तमान पत्रासाठी श्री.थोरात यांनी तालुक्यात चांगले काम केले होते.आता देखील निफाड येथुन गावकरी साठी ते काम करतात.आपली स्वतःची किर्तनाची कला जोपासुन वारकरी शिक्षण संस्था व पत्रकारिता असा मेळ त्यांनी घातला आहे.त्यांची मुलगी ह.भ.प.सौ.गीतादीदी ऋषिकांत कदम या देखील प्रसिद्ध किर्तनकार आहेत.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे,महासचिव संजय भोकरे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, प्रदेश संघटक विश्वास आरोटे यांच्या उपस्थितीत ठाणे येथे सदर निवड झाली.कोपरगावची माणसं जिथं जातील तिथं आपलं वलय निर्माण करुन जनमानसात प्रेम निर्माण करतात.इथल्या साखरेप्रमाणे इथली माणसं गोड आणि गोदावरी प्रमाणे निर्मळ आहेत .या निवडीबद्दल थोरात महाराज यांचे परीसरातुन अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *