
कोपरगाव प्रतिनिधी:- आपले राजकारणाचे मूळ हे कॉंग्रेस पक्ष आहे याची जाणीव युवानेते विवेक कोल्हे यांनी देशाचे नेते मा.खा.राहूलजी गांधी यांच्यावर टीका करण्यापूर्वी करून घ्यावी असे उद्गार काँग्रेस पक्षाचे जिल्हा,तालुका व शहर पदाधिकाऱ्यांनी केली.नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल आपले अभिनंदन व शुभेच्छा आहे त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत गांधी घराण्यावर आपण मिश्किल टिपण्णी केली परंतु विजयाची हवा काही क्षणात डोक्यात जाऊन राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यावर टीकास्त्र सोडून प्रसिद्धीस पात्र होणार नाही हे लक्षात घ्यावे,मोकळे भांडे आवाज करते,भरलेले भांडे कधीही आवाज करत नाही काँग्रेस पक्षाचे विचार व नेते हे ज्ञानाने भरलेल्या भांड्याप्रमाणे आहे त्यास प्रसिद्धीची गरज नाही आपण ज्या पक्षात आहेत त्यात मोकळ्या भांड्याप्रमाणे फक्त आवाज,घोषणा आणि भाषण करणारे लोक आहेत जनता हुशार आहे आगामी काळात लोक प्रत्येकाची जागा निश्चित दाखवतील यात शंका नाही,अवघ्या जनतेला जेष्ठ नेते माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचा राजकीय जीवनप्रवास,कर्तृत्व ठाऊक आहे त्यातला मूळचा गाभा हा काँग्रेस पक्षाचा आहे आपण जर मूळ पाया विसरून गांधी घराण्यावर आरोप करणार असाल तर यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल असे पदाधिकारी यांनी सांगितले या वेळी अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तुषार पोटे,तालुकाध्यक्ष नितीन शिंदे,शहराध्यक्ष सुनील साळुंके,युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अक्षय आंग्रे,तालुकाध्यक्ष श्रीजय चांदगुडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
