माननीय राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा अहमदनगर जिल्हा दौरा..!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनीधी:- महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल माननीय श्री. भगत सिंह कोश्यारी यांचा अहमदनगर जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
रविवार दिनांक 30 जानेवारी 2022 रोजी दुपारी 3.15 वाजता शासकीय विश्रामगृह सिन्नर जि. नाशिक येथून मोटारीने महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरीकडे प्रयाण. दुपारी 4.45 वाजता महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथे आगमन व राखीव. सायंकाळी 5 वाजता महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथून मोटारीने शनिशिंगणापूर ता. नेवासाकडे प्रयाण. सायंकाळी 5.30 वाजता शनिशिंगणापूर येथे आगमन दर्शन व राखीव. सायंकाळी 6 वाजता शनिशिंगणापूर ता. नेवासा येथून मोटारीने शिर्डीकडे प्रयाण. रात्रौ 7.30 वाजता शासकीय विश्रामगृह शिर्डी येथे आगमन. राखीव व साईमंदिर येथे दर्शन. शासकीय विश्रामगृह येथे राखीव भोजन व मुक्काम.
सोमवार दिनांक 31 जानेवारी 2022 रोजी साई मंदिर येथे दर्शन व राखीव. सकाळी 9 वाजता शासकीय विश्रामगृह शिर्डी येथून मोटारीने सिन्नर जि. नाशिककडे प्रयाण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *