कोपरगाव मनसे शहराध्यक्ष सतीश काकडे यांना जिवे मारण्याची दिली धमकी…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यात ग्रामीण भागात वीज वितरण कंपनीने मिटर रीडिंग घेण्याचे कंत्राट संगमनेर येथील दिलीप नरहरी चकोर यांचे चाणक्य मल्टीस्टेट सर्व्हिसेस या कंपनीला दिलेले असून
सदर कंपनीमार्फत ग्रामीण भागात मिटर रीडिंग घेण्याचे काम सुरू आहे. सदर कंपनीमार्फत मिटर रीडिंग घेण्या साठी कामगारांची नेमणूक करण्यात आली आहे .
असे असताना दिलीप चकोर यांनी कामावरून 3 कर्मचाऱ्यांना मारहाण शिवीगाळ करून कमी केले होते. त्यामुळे सदर कंत्रादारांकडून कमी करण्यात आलेले कामगार यांनी सदर प्रकार मनसे शहर अध्यक्ष सतीश काकडे यांना सांगितला
त्यावेळी त्यांनी कामगारांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दिलीप नरहरी चकोर यांच्या चाणक्य मल्टीस्टेट कंपनी बाबत व दिलीप चकोर यांचे कंत्राट बाबत माहिती अधिकारात माहिती मागितली होती.
त्याचा राग मनात धरून दिलीप चकोर व त्याचे मित्र दिलीप अभंग संगमनेर यांनी सतीश अण्णा काकडे यांना फोन करून आरे – राविच्या भाषेत बोलत तु दिलीप चकोर यांच्या बद्द्ल माहिती अधिकारात माहिती का मागितली याचा जाब विचारला व शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली
, त्यामुळे दिलीप चकोर व दिलीप अभंग याचे विरूद्ध कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात जिवे मारण्याची धमकी दिली , शिवीगाळ केली म्हणून दिलीप अभंग व दिलीप चकोर यांचे विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलीप चकोर व दिपक अभंग यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी.
अन्यथा
मनसे स्टाईल ने आंदोलन करु असा इशारा मनसैनिकांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *