
कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव शहरात २३ जानेवारी रोजी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी झाली आहे.कोपरगाव शहरात संपर्क प्रमुख उदय दळवी,उत्तर अहमदनगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे,कोपरगाव विधानसभा संघटक अस्लमभाई शेख, मा.शहरप्रमुख भरत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक, सांस्कृतिक, उपक्रम राबवित साजरी करण्यात आली आहे.शहरातील बसस्थानका समोर बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन उत्तरनगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांच्या हस्ते करण्यात आले.



या प्रसंगी शहरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.एस.टी.कामगार सेनेचे कोपरगाव शहरप्रमुख भरत मोरे,कोपरगाव विधानसभा संघटक अस्लम शेख,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्यध्यक्ष संदीप वर्पे,कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष किरण बिडवे,शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रमोद लबडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल गंगुले,ग्राहक संरक्षण मंचाचे मुकुंद सिनगर,नगरसेवक विरेन बोरावके,ज्येष्ठ शिवसैनिक राजु डागा,अरविंद सावजी,पोपट झुरळे,नगरसेवक हाजी महेमुद सय्यद,दिनार कुदळे,मकरंद जोशी, सोनवणे मामा,सोमनाथ शिंगाडे, एस.बी.वाणी,राष्ट्रीय स्वयं संघाचे अमित जैन,भागवत सर,निकम सर,टेकचंद खुबाणी,बाळासाहेब सांळुके,विकास शर्मा,गगन हडा, विशाल झावरे ,व्यापारी सेनेचे योगेश मोरे,सुनिल कुंढारे,योगेश उशिरे,महेश गायकवाड, टोरपे मामा,मधूकर कोते,दिलीप उगले,अंकुश वाघ,रमेश गवळी,वाल्मीक लहिरे,फकिर शेख,संतोष झावरे,शेखर कोलते,श्रीपाद भसाळे,वैभव होते,शैलेश वाघ,अमित खुबाणी,प्रमोद बोथरा,अशोक पवार, प्रवीण शेलार,अविनाश वाघ,एस.टी. राकेश वाघ, किरण अढांगळे,एस.टी.कामगारसेनेचे राजाभाऊ वाघमारे,अभिजित जाधव,ग्राहक संरक्षण कक्षाचे अशोक पवार,रविद्र देवकर,शिंगणापुर गट प्रमुख प्रवीण शिंदे,गोपाल वैरागळ,राहुल हंस,संजय वाबिस्कर, विजय सोनावणे,दत्ता पुंडे,वाल्मीक जाधव,मधुकर पवार,वाहतुक सेनेचे अमजत शेख,मोबिन शेख,जाफर पठाण, निलेश पवार, प्रफुल्ल शिंगाडे,दत्तु पगारे,मयुर दळवी,निशांत झावरे,करण दळवी विकास शर्मा उमेश छुगाणी गणेश थोरात पप्पु पेकळे किरण कुर्हे आदि शिवसैनिक नागरिक विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.आज शिवसेनेच्या वतिने विविध कार्यक्रम संपन्न झाले आहे.कोपरगाव शहरात युवती सेनेच्या वतिने हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन गोरगरिबांना ब्लेकेट साईबाबा काँर्नर, दत्तपार या ठिकाणी वाटप करण्यात आले आहे.



युवती सेनेच्या वतिने युवतींना रोजगार मिळावा यासाठी बुटी पाँर्लरचे एक महिण्याचे प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन सामाजिक कार्यकर्त्यां युवती सेनेच्या जिल्हा अधिकारी स्नेहा लुंड, कल्पना वैद्य युवती सेना उप अधिकारी श्रीरामपुर यांच्या हस्ते करण्यात आले आहे.यावेळी अक्षिता आमले अनिता वायखिंडे, शितल चव्हाण,अमृता राऊत, पूजा शर्मा,आरती कौर,प्रीती कोपरे,गौरी सांळुके,सुकन्या आमले,स्नेहल कुडके,कोमल कुडके,आरती बावरकर,तनवी कुवर उपस्थित होत्या.शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष चे कोठारी हॉस्पिटल -आर्थोपेडिक इन्टेसिव्ह केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने नगरपालिकेतील आरोग्यसेवक व कर्मचार्यासाठी मोफत आरोग्य शिबीर दि.२३ जानेवारी २०२२ -रविवार रोजी संपन्न झाले आहे. या शिबिरात मोठ्या संख्येने कर्मचारी बांधवांची तपासणी करण्यात आली आहे.शहरात यावेळी भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. ३० रक्तदात्यांनी रक्तदान करुन बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले आहे.स्वराज्य सेना शाखा क्र ५ च्या वतिने भव्य मोफत सर्व रोगनिदान शिबिर संपन्न झाले असुन चारशे नागरिकांची तपासणी यावेळी करण्यात आली आहे .शहरात धारणगाव रोड येथे शिवनेरी शाखेचे भव्यदिव्य उदघाटन करण्यात आले आहे.मधुकर पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.गांधीनगर परिसरात राजे प्रतिष्ठानच्या वतिने भव्य रांगोळी स्पर्धा संपन्न झाली आहे.शहरात हनुमाननगर,गांधीनगर रोड,धारणगाव रोड,बस स्थानक परिसर,तसेच शहरात ठिकठिकाणी भगवे झेंडे पताके लावुन बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी झाली आहे. आज शहरात भगवेमय वातावरण निर्माण झाले होते.या प्रसंगी कलविंदरसिंग दडियाल म्हणाले की हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती,सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम राबवून साजरी करत असुन शहरात शिवसेनेचे कामकाज जोरदार चालू असुन जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली असेच कामकाज करत राहू. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देवुन कार्यक्रमाची सांगता झाली.
