
कोपरगाव प्रतिनिधी:-
श्रीरामपूर येथे नव्याने हजर होत असलेल्या अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथिल अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी
काल दि.२० जानेवारी २०२२ रोजी पदाचा पदभार सांभाळला असून श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.दिपाली काळे यांची नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण अकॅडमी मध्ये बदली झाली आहे तसेच नव्याने हजर झालेल्या स्वाती भोर हया बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे कार्यरत होत्या त्यांनी तिथे उत्कृष्ट असे काम केलेले आहे तसेच या आगोदर अहमदनगर जिल्यातील संगमनेर येथे उपविभागीय अधिकारी म्हणून देखील त्यांनी काम केलेले असल्याने तेव्हा त्यानां याभागातील चांगल्या प्रकारे माहीती आहे त्यांच्या अधिकारात येणारे ४ पोलिस उपविभागीय अधिकारी तसेच श्रीरामपूर नेवासा राहुरी राहाता कोपरगाव संगमनेर व अकोला या ७ तालुक्यातील १७ पोलीस स्टेशनसह श्री. साईबाबा संस्थान ची सुरक्षा विभाग यंत्रणा शिर्डी वाहतूक शाखा त्यांच्या अधिकारात येत असून स्वाती भोर या फार शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष अशा अधिकारी म्हणून त्यांचे नाव आहे अशा या शिस्तप्रिय अधिकारी स्वाती भोर येथे आल्यामुळे पोलीस अधिकारी व महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी खुश असून सर्वत्र त्यांचे स्वागत होत आहे.
